![]()
संशोधनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान तुमचा स्पर्धक नसून, त्याचा मदतनीस म्हणून वापर करा, असा सल्ला तंत्रज्ञान क्षेत्रातील डिजिटल साक्षरता कार्यकर्ते डॉ. दीपक शिकारपूर यांनी दि
.
पुण्यात राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सेंटर फॉर सोशल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट पुणे, साऊथ एशियन जर्नल ऑफ पार्टिसिपेटिव्ह डेव्हिलपमेंट, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस पुणे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद पार पडला.
या परिसंवादात डॉ. शिकारपूर यांनी शुक्रवारी ‘द फ्युचर ऑफ रिसर्च इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’ या विषयावर शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स: स्ट्रेन्थनिंग रिसर्च फॉर विकसित भारत @ २०४७’ या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा कसा वाढविता येईल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. यात ११ राज्यातील २०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते.
डॉ. दीपक शिकारपूर यांनी पुढे सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानातील जनरेटिव्ह एआयचा अयोग्य वापर अत्यंत घातक ठरू शकतो. हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्याने महाविद्यालयीन अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत करणे आवश्यक आहे.
तांत्रिक विषयात शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राशी जोडून घेतल्यास विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ५० टक्के तांत्रिक अभ्यासक्रम आणि ५० टक्के प्रत्यक्ष अनुभव अशा पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी ‘स्मार्ट टिचर’ बनून विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करावे, जेणेकरून उत्तम विद्यार्थी घडतील आणि शिक्षकांनाही समाधान मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर पूर्णपणे अवलंबून राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे.