![]()
एका महिलेस 25 लाख रुपयांत तब्बल अर्धा किलो सोने देण्याच्या आमिष दाखवून 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.
याबाबत एका 58 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पवन मकसूद ठाकूर (वय 39, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, मालाड, मुंबई), राजू गिट्टी या आरोपींच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी ठाकूर यांची ओळख झाली होती. तक्रारदार महिला एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे. आरोपींनी महिलेला 25 लाख रुपयांमध्ये अर्धा किलो सोने देण्याचे आमिष दाखविले होते.आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी 25 लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी महिलेला सोने दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एन धनवडे पुढील तपास करत आहेत.
आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाखांना गंडा
शेअर मार्केटमधील आयपीओमध्ये गुंतवुणक करण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख 98 हजारांचा गंडा सायबर चोरट्यांनी एकाला घातला. याप्रकरणी विशाल सक्सेना (49, रा. लोहगावरोड, धानोरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 16 मे ते 8 जुलै दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी संबधीत मोबाईलधारक व्यक्ती, बँक खातेधारक व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.