Uddhav Thackeray: नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच महायुती सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते पदावरुन राज्यभरात सुरु असलेल्या चर्चेवर काय म्हणाले उद्धव ठाकरे? जाणून घेऊया.
महाराष्ट्रात यंदा अतिपावसाने खूप नुकसान झाले. नागपूर अधिवेशनात विदर्भ आणि संपूर्ण राज्याच्या समस्या चर्चिल्या जात आहेत. शेतजमिनी पाण्यात वाहून गेल्या, पिके उद्ध्वस्त झाली. मुख्यमंत्र्यांनी मोठे पॅकेज जाहीर केले, पण ते प्रत्यक्षात अंमलात येताना अगदी थेंबाथेंबाने मिळत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले की, महाराष्ट्राने मदतीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता, त्यामुळे सरकारला दोष देतात. शेवटी शेवटी तो पाठवला, पण केंद्र मदत देईल की नाही, याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांसोबत हे सरकार फक्त मजा करत असल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीत अनैतिक राजकारण
महाराष्ट्राने अशी निवडणूक कधीच पाहिली नव्हती. इतर राज्यांत होणारे सर्व गैरप्रकार आता इथे सुरू झाले आहेत. बेबंदशाही चालू आहे. मित्र म्हणून सांगणाऱ्या पक्षांचे पैसे आणि व्हिडिओ बाहेर काढले जात आहेत. हे सर्व काही तरी दाखवते की, राजकारणात विश्वास राहिला नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
मंत्रीमंडळातील बदल
नवीन मंत्री तयार करण्यासाठी नवे खाते उघडून त्याला मंत्री म्हणून पगार द्या. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते पद हाताळावे. असे करून सरकार अधिक प्रभावी होईल. हे सगळे बदल आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
‘मला हिंदुत्व शिकवू नये’
अमित शहा मोठे नेते आहेत, पण त्यांनी आणि भाजपने मला हिंदुत्व शिकवू नये. राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’वर कशी चर्चा होऊ शकते? त्यांच्या मंत्रीमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत, त्यांना काढून दाखवा. आरएसएससाठी मंदिर पाडले गेले. पालघरमध्ये साधूंच्या हत्याकांडातील आरोपींना भाजपने पक्षात घेतले, तेव्हा माझ्यावर आरोप केले होते. आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले?
विरोधी पक्षनेता कोण?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षनेत्याच्या नावावरुन चर्चा सुरु आहेत. हे पद आदित्य ठाकरेंना देण्यात येणार असून त्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सांगितले होते की, विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा आहे. भास्कर जाधव यांचे नाव मी खूप आधीच सुचवले आहे, पण त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. उपमुख्यमंत्री पद देतात, पण विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी घाबरतात का? हे पद देण्यासाठी नियम लावत असाल तर असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्री पदही रद्द करा. ते म्हणजे पहिला नंबर म्हणजे दुसरा नंबरच असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
FAQ
प्रश्न : उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते कोणाला बनवू इच्छितात?
उत्तर : उद्धव ठाकरे म्हणतात की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा अधिकृत दावा आहे आणि विरोधी पक्षनेते पद भास्कर जाधव यांना द्यावे. त्यांनी हे नाव खूप आधीच सुचवले आहे, पण सभापती अजून निर्णय घेत नाहीत.
प्रश्न : शेतकऱ्यांच्या मदतीबाबत उद्धव ठाकरेंनी सरकारवर काय टीका केली?
उत्तर : यंदाच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले पण प्रत्यक्षात मदत ठिबक सिंचनासारखी थेंबाथेंबाने मिळते. केंद्राकडे वेळेवर प्रस्तावच पाठवला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांशी सरकार थट्टा करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
प्रश्न : अमित शहा आणि भाजपला उद्धव ठाकरेंनी कशाबद्दल सुनावले?
उत्तर : उद्धव म्हणाले, “भाजपने मला हिंदुत्व शिकवू नये. त्यांच्या मंत्रीमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत तर त्यांना बाहेर काढावे. पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना भाजपने पक्षात घेतले. RSS साठी मंदिर पाडले जाते. मग आमचे हिंदुत्व कुठे गेले असा प्रश्न तुम्हाला विचारायचा का?” असा थेट सवाल त्यांनी अमित शहा व भाजपला केला.