![]()
संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत मांडणारा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दुसरा मुख्यमंत्री देशात नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. निमित्त होते,
.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या स्वभावाचे वर्णन आपल्या खास शैलीत केले. ते म्हणाले, देवेंद्रजी हे सावजी मटणासारखे झणझणीत तिखट आहेत, तर कधी नागपुरी संत्र्यासारखे गोडही आहेत. कितीही गंभीर परिस्थिती असली तरी शांत, स्थिर आणि थंड डोक्याने निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अद्वितीय आहे. नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची साक्ष देतो, असेही शिंदे यांनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचा गौरव करताना शिंदे यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे उदाहरण दिले. जसे चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन ‘बिग बी’ आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे ‘बिग डी’ आहेत. डी म्हणजे डेडीकेशन, डिटरमिनेशन, डिसिप्लिन आणि डिव्होशन, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांच्या कामाची पद्धत उलगडली.
संविधानावर ‘फेक नॅरेटिव्ह’ला उत्तर
मार्चमधील अधिवेशनात संविधानावर झालेली चर्चा हा कळसाध्याय होता, असे सांगत शिंदे म्हणाले की, काही लोकांनी संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार केला. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कलम 370 च्या विरोधात होते, हे फडणवीस यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ते कलम हटवून ऐतिहासिक कार्य केले, याचा अभिमान फडणवीस यांनी बाळगला.
हळवा मित्र आणि आधारवड
राजकारणापलीकडचा माणूस म्हणूनही एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांचे निधन कर्करोगाने झाल्यानंतर नागपुरात त्यांनी उभे केलेले कॅन्सर हॉस्पिटल त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतीक असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच, 2022 च्या सत्तासंघर्षाच्या निर्णायक काळात फडणवीस यांनी एका खऱ्या मित्राप्रमाणे दिलेला आधार आपण कधीही विसरू शकत नाही, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.