पालिका निवडणुकीआधीच महायुती फुटणार? भाजप-शिवसेनेच्या गट्टीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी? जाणून घ्या नेमंक काय चाललंय!


BJP Shiv Sena Alliance: नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता पालिका निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, मुंबई निवडणुकीच्या मैदानात भाजप शिवसेनेला सोबत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर अजित पवारांना मुंबईत सोबत न घेण्यावर भाजप ठाम असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Add Zee News as a Preferred Source

राज्यात लवकरच महानगरपालिका निवडणुकींचं बिगुल वाजणार आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनं रणनीती आखलीय, मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.तर दादांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय, अधिवेशनानंतर मुंबईतील जागावाटपावर चर्चा होणार असून दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 2 असे एकूण चार नेते वाटाघाटीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी? 

हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत. नवाब मलिक यांच्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजपचा विरोध? असल्याची चर्चा आहे. दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेंमध्ये जागावाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

नवाब मलिकांवर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप असल्यामुळे भाजपचा त्यांना विरोध आहे. नवाब मलिकांबाबतची भाजपची भूमिका अजित पवारांपर्यंत पोहोचवल्याची माहितीही प्रसाद लाड यांनी दिलीय. त्यामुळे मलिक कुटुंब सोडून इतर कुणी युती करण्यासाठी तयार असेल
तर आम्ही करू अशी रोखठोक भूमिका भाजपनं मांडलीय.

भाजपनं नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला अडचणीत टाकल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र मुंबई आणि राज्यातील इतर पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं स्पष्ट केलंय.

अनेक वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपकडून खास प्लॅन तयार करण्यात आलाय. पालिका निवडणूक युतीमध्ये लढायची कि स्वतंत्र यावर महायुतीमधून अधिकृतपणे कोणतीही घोषणा झालेली नाही.. मात्र, मुंबईत दादांच्या
राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भाजपची भूमिका असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सोडून भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढल्यास त्याचा फायदा महायुतीला किती होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

FAQ

१. प्रश्न : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची रणनीती काय आहे?

उत्तर : महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर जोर देण्यात येणार आहे. अधिवेशनानंतर जागावाटपावर चर्चा होईल, ज्यात प्रत्येकी २ नेते सहभागी होणार आहेत. मात्र, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मुंबईत सोबत न घेण्यावर भाजप ठाम आहे.

२. प्रश्न : भाजपचा राष्ट्रवादीला (अजित पवार गट) सोबत न घेण्याचं मुख्य कारण काय?

उत्तर : नवाब मलिकांवर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप असल्यामुळे भाजपचा विरोध आहे. नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नेमले असल्याने भाजपने त्यांना महायुतीत नको, अशी भूमिका घेतली आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ही भूमिका अजित पवारांपर्यंत पोहोचवली आहे.

३. प्रश्न : राष्ट्रवादीला सोडल्यास महायुतीला फायदा होईल का?

उत्तर : शिवसेनेच्या दीर्घकाळाच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्रितपणे लढल्यास मतविभाजन टाळता येईल आणि मुंबईत मजबूत भूमिका मिळू शकते. मात्र, राष्ट्रवादीला वगळल्याने मुस्लिम मतदार आणि काही भागांमध्ये नुकसान होऊ शकते. निवडणूक डिसेंबर-जानेवारीत अपेक्षित असून, याचा परिणाम महायुतीच्या एकजुटीवर अवलंबून असेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *