‘या’ मराठ्यांनाच होणार आरक्षण GR चा सर्वाधिक फायदा! गावात एक जरी कुणबी नोंद सापडली तरी…


Maratha Reservation Maximum Beneficiary: मराठा आरक्षण आंदोलनाला यश मिळाल्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा फायदा होणार आहे. इतर मागास वर्गाचे (ओबीसी) प्रमाणपत्र मिळविणे आणि त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया सोपी केल्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

कसं मिळणार ओबीसी प्रमाणपत्र?

राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तीला कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा – कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यास मदत करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) आणि सहायक कृषी अधिकारी (कृषी सहायक) यांची समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच आताचे शेतकरी, भूमिहीन किंवा वाट्याने शेती असल्यास 13 ऑक्टोंबर 1967 पूर्वी त्यांचे वंशज शेतकरी असल्याची नोंद असल्यास किंवा यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तींनी आपल्या नातेसंबंधातील व्यक्तीला प्रतिज्ञापत्रावर लिहून दिल्यास त्याला ही ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे, याचा मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातील मराठा समाजाच्या लोकांना फायदा होणार आहे. 

शिक्षण, नोकरीसाठी मोठी मदत

मराठवाड्यात आजघडीला खुल्या वर्गात असलेल्या सर्वच जातींना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता बळावली आहे. प्रामुख्याने शिक्षण, नोकरीसाठी मोठी मदत मिळणार आहे. राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन उभारण्यात आल्याची टीका होत असली तरीही राजकीय फायदा फारसा होणार नाही. कारण, सध्या राजकारण्यांनी अगोदरच ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवले आहे.

एका गावात एक जरी कुणबी नोंद सापडली तरी…

गॅझेटियरमध्ये 1881 ते 1901 या काळातील नोंदी आहेत. त्यावेळी पाच जिल्हे होते, आता आठ जिल्हे झाले आहेत. आता गाव समिती शिफारस करेल. नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले तरी ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे. मराठवाड्यापुरता हा निर्णय दूरगामी ठरणार आहे.

गॅझेटियरमध्ये एखाद्या गावात कुणबी आहेत, इतकीच नोंद आहे. किंवा घर क्रमांकावर कुणबी नोंद आहे. काही नोंदीची माहितीच नाही किंवा नोंदी अर्धवट आहेत. त्यामुळे ओबीसी प्रमाणपत्र मिळत नव्हते, मिळाले तरी त्यांची पडताळणी होत नव्हती.

एका गावात एक जरी कुणबी नोंद सापडली तरी संपूर्ण गावाला ओबीसीचा दाखला मिळणे शक्य होणार आहे. कारण 1901 च्या पूर्वी असलेल्या एका व्यक्तीपासून आजघडीला 60 ते 70 जणांचे कुटुंब निर्माण झाले आहे.

FAQ

मराठा आरक्षण आंदोलनाला यश का मिळाले?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखले जाणार आहे, ज्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल.

मराठा समाजाला याचा कसा फायदा होणार आहे?

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना ओबीसी कोट्यातून शिक्षण आणि नोकरी यांसारख्या क्षेत्रांत आरक्षणाचा लाभ मिळेल. यामुळे खुल्या प्रवर्गात असलेल्या मराठ्यांना आता ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळतील, ज्यामुळे त्यांचे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण दूर होण्यास मदत होईल. विशेषतः मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना याचा थेट फायदा होईल.

एका गावात एकच कुणबी नोंद सापडली तरी काय होईल?

जर एखाद्या गावात हैदराबाद गॅझेटियर किंवा सातारा गॅझेटियरमध्ये एकच कुणबी नोंद सापडली, तरी त्या नोंदीच्या आधारे संपूर्ण गावातील मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. कारण 1901 पूर्वीच्या एका व्यक्तीपासून आज 60 ते 70 जणांचे कुटुंब तयार झाले आहे. यामुळे गावातील अनेक मराठा कुटुंबांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *