![]()
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतींमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या आठपैकी सहा नगरसेवकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबित केले आहे. मात्र या निर्णयावर महायुतीतील दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या जिल्हाध्य
.
सिंधुदुर्ग मधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या कारवाईनंतर तळ कोकणातील महायुतीत वादाची ठिणगी पडली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपमधील या कारवाईला थेट विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे. मात्र, भाजपमधील घटनेच्या चौकटीत राहून आम्ही कारवाई केली असल्याचे प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी देखील टीका केली आहे.
नीलेश राणे वरिष्ठांशी बोलतील
कुडाळ नगरपंचायतींमधील नगरसेवकांचा केलेले निलंबन हे भाजपच्या घटनेच्या चौकटीत असल्याचे प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे. वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाविषयी कोणाच्याच मनात किंतू परंतु असण्याचे कारण नाही. नीलेश राणे हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. त्यांना जे काही बोलायचे असेल तर ते वरिष्ठांशी बोलतील. मात्र, जिल्हा अध्यक्ष म्हणून मी माझे काम केले असल्याचे प्रभाकर सावंत यांनी म्हटल आहे. नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. पक्षात पक्ष हिताच्या दृष्टीने जर कोणाचे काम नसेल, त्यामुळे राणे साहेबांची प्रतिमा खराब होता कामा नये, यासाठी आमचे प्रयत्न असतात, असे देखील सावंत यांनी म्हटले आहे.
वैभव नाईक यांना देखील प्रत्युत्तर
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वैभव नाईक यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे. वैभव नाईक यांनी महायुतीच्या विषयात बोलण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम नीट करावे. महायुती मधील दोन पक्षात भांडण व्हावे आणि आपले काहीतरी फावेल असे वैभव नाईक यांना वाटत असेल. त्यामुळेच वैभव नाईक अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असल्याचे प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे. वैभव नाईक यांची स्टेटमेंट मी फार गांभीर्याने घेत नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
नीलेश राणे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…
या संदर्भात नीलेश राणे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार श्री नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू. सिंधुदुर्गात भाजप चे निर्णय हे खासदार श्री राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही.’