Kasganj Woman Tantrik: उत्तराखंडच्या कासगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. येथे एका विषारी किड्याने चावा घेतल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर तंत्र-मंत्राचा वापर करुन या तरुणाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 21व्या शतकातही असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अंधश्रद्धाच्या आहारी गेलेल्या या नागरिकांचे समुपदेशन करण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे.
झोपेतच विषारी किड्याचा चावा
25 वर्षांच्या एका तरुणाला झोपेतच विषारी किड्याने चावा घेतला. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंतच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पुन्हा गावात आणण्यात आला. त्याच्या कुटुबीयांनी आणि गावातील नागरिकांनी एका महिला तांत्रिकाला बोलवले. महिलेच्या बोलण्यात येऊन पीडित कुटुंबाने यावर विश्वास ठेवला.
महिलेने पाच दिवसांपर्यंत केले नाटक
पाच दिवस महिलेने मयत व्यक्तीच्या मृतदेहाशेजारी ढोल मजीरा आणि थाळी वाजवत मंत्र उच्चारले. दोन दिवस मृतदेह पाण्यात्या खड्ड्यात ठेवला. या दरम्यान सातत्याने महिला मांत्रिक या विधी करत होती. गावकऱ्यांचे म्हणणे होते की या पद्धतीने तरुण पुन्हा जिवीत होईल. ही गोष्ट जेव्हा संपूर्ण गावात व इतर भागात पसरली तेव्हा हे पाहायला रहिवाशी घटनास्थळी दाखल झाले होते.
अंधविश्वासापायी ही घटना पाहण्यासाठी संपूर्ण गावाला जत्रेचे स्वरुप आले होते. मात्र ही समाजासाठी हानिकारक आहे. विज्ञानाच्या युगातही अशा घटना घडत असताना आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
FAQ
1) ही घटना अंधश्रद्धेचे उदाहरण का मानली जाते?
वैज्ञानिक युगातही मृत व्यक्तीला तंत्र-मंत्राने जिवंत करण्याचा प्रयत्न करणे हे अंधश्रद्धेचे लक्षण आहे. अशा कृती समाजासाठी हानिकारक असून, यामुळे तर्क आणि विज्ञानावर आधारित विचारसरणीला बाधा येते.
2) या घटनेनंतर काय कारवाई करण्याची मागणी झाली आहे?
या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या नागरिकांचे समुपदेशन करण्याची मागणी होत आहे. तसेच, अशा प्रकारच्या अंधविश्वासाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रथांवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
3) या घटनेचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मूल्यमापन काय आहे?
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मृत व्यक्तीला तंत्र-मंत्राने जिवंत करणे अशक्य आहे. अशा कृती केवळ अंधविश्वासाला प्रोत्साहन देतात आणि समाजाला मागासलेपणाकडे नेतात. तज्ञांचे मत आहे की अशा प्रथांमुळे वैद्यकीय उपचारांना उशीर होऊ शकतो, ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वाढते.