अमरावतीत सोमवारी विविध संघटनांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राजकमल चौकात जन आक्रोश आंदोलन केले. शिवसैनिकांनी प्रतीकात्मक पद्धतीने ‘योगेश भाऊचा डान्सबार’ भरवून योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या प्रतिमांत
.
दुसरीकडे, डीआरडीएच्या ‘उमेद’ प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. एका कर्मचारी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून त्यांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांची तातडीने बदली करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सीइओ संजीता महापात्र यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांची मागणी मान्य न केल्यास संपूर्ण महाराष्ट्र ठप्प पडण्याचा इशारा त्यांनी दिला.
याचबरोबर अखिल भारतीय नवजवान सभा आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. एकाच दिवशी झालेल्या या चार आंदोलनांमुळे शहरात गलबला निर्माण झाला.
