प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मालकीच्या भावनेने राज्य करणे म्हणजे प्रशासन अथवा सुशासन नव्हे तर लोकतंत्रामध्ये आपण जनतेची सेवा करण्यासाठी आहोत ही भावना जनसेवकाची असली पाहिजे. सुशासनाबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असून शकतो, परंतु जनतेला सोबत घेऊन केलेल
.
सरहद, पुणेतर्फे भारताचे माजी गृह सचिव स्व. डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ सोमवारी ‘सुशासन : कल्पना की वास्तव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वजाहत हबीबुल्लाह बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव,राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर होते. व्याख्यानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. व्याख्यान टिळक स्मारक मंदिर येथे झाले.
याच कार्यक्रमात डॉ. माधव गोडबोले स्मृतिप्रित्यर्थ गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवृत्त विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.
.. तर पंडितांचे स्थलांतर टळले असते
दूषित प्रशासन व्यवस्थेमुळे देशाची फाळणी झाली, जनता मारली गेली असे सांगून वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, देशातील हिंदू-मुस्लिमांध्ये धर्मावरून कायम तेढ निर्माण व्हावी हाच पाकिस्तानचा हेतू राहिला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पहेलगामधील धर्मविचारून केलेली हिंदूंची हत्या होय. १९६८ ते १९८२ या काळात काश्मीरमध्ये कार्यरत असताना तेथील सामाजिक वातावरण पूर्णत: अहिंसा आणि प्रेमाचेच होते. पाकिस्तानने धार्मिक तेढ निर्माण केल्यानंतर प्रशासनाने स्थानिक जनतेला विश्वासात घेवून हिंदूंची सुरक्षितता सांभाळली असती तर पंडितांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले नसते. काश्मीरी आम जनतेला विश्वासात घेऊन सुशासन निर्माण करणे ही त्या काळातील सरकारची जबाबदारी होती.
माहिती अधिकाराविषयी बोलताना वजाहत हबीबुल्लाह पुढे म्हणाले, या विभागात काम करू लागल्यानंतर जनतेला नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कायद्यांविषयक तसेच सरकारच्या प्रत्येक कृतीविषयक माहिती नव्हती, हे लक्षात आले. सरकारी कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या विभागीय कामकाजाबद्दलही माहित नव्हते.