नाशिक येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकऱ्यांच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटातील दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेले व त्यातून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच
.
शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकऱ्यांच्या बैठकीत मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित होते. या बैठकीच्या वेळी दोन गटात जोरदार राडा झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत दोन गट आपापसात भिडले. घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
पक्षाकडून त्यांची गय केली जाणार नाही- उदय सामंत
या प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्या व्यक्तीच्या समर्थकांनी हे केले, त्याची दखल घेतली आहे. पक्षाकडून त्यांची गय केली जाणार नाही. या घटनेचा आढावा शिंदे साहेबांना देणार आहे. किरकोळ वाद आहे, गैरसमजामधून हे झाले आहे. स्वतःच्या प्रसिद्धसाठी त्यांनी बैठकीतील सांगणे हे उचित नाही. आम्ही त्यांना समज दिली आहे. ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती. आम्ही भिंग घेऊन इतर लोकांना शोधून काढू, असे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ म्हणाले की, सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चेला उपस्थित होते. आतमध्ये वाद झालेला नाही, बाहेर झाला असेल तर मला माहित नाही. बैठकीत कोणत्याही विषयावरून वाद झाला नाही. पक्षाच्या स्तरावर मुख्य नेते एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. मी शिवसेना पक्षात नवीन आमदार आहे. बैठकीमध्ये कोणताही वाद झाला नाही. गैरसमजीतून हा वाद झाला का? यावर वरिष्ठ निर्णय घेतील. सचिन जाधव हे आमचे पदाधिकारी आहेत. एकनाथ शिंदे साहेब यांना या प्रकरणाचा अहवाल दिला जाईल. वादाची मला कोणतीही माहिती नाही, मी माहिती घेतो.