हिंगोली जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासोबतच मुलींचे मनोधैर्य वाढीस लागावे. तसेच, लिंग गुणोत्तर प्रमाणासाठी जनजागृती व्हावी, यासाठी एक दिवस मुलींसाठी हा उपक्रम प्रशासनाने सोमवारी ता. ११ राबविला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व महत्वाची पदे मुलींच्या हाती देऊन त्
.
हिंगोली जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण वाढण्यासाठी जनजागृती व्हावी, गावपातळीवर होणारे बालविवाह रोखले जावे. तसेच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी एक दिवस मुलींसाठी हा उपक्रम राबविला. या उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून एका मुलीस आमंत्रित करण्यात आले होते. या मुलींचा सत्कार करून त्यांना ओळखपत्रे देण्यात आली. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष अधिकारी पदाचा अनुभव देण्यात आला.
यामध्ये मुलींची प्रामुख्याने जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, वन अधिकारी पद देण्यात आले. यावेळी मुलींनीही अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज चालविले. तसेच, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयास क्षेत्रीय भेटी देऊन तेथील कामकाजाची माहितीही घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी मुलींना खाते प्रमुख म्हणून कामकाज कसे चालते, निर्णय कसे घ्यायचे, प्रशासकीय कामकाजात निर्णय प्रक्रिया कशी महत्वाची आहे, याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेत या मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गटविकास अधिकारी विष्णू भोजे, माधव कोकाटे, मधुकर राऊत, संदीप अन्नदाते उपस्थित होते.