महाराष्ट्रात रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून वाद पेटलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आक्षे
.
पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच आता आता रायगडमध्ये 15 ऑगस्ट रोजी अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर झाले आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत.
पालकमंत्री पदाची यादी वर्षाच्या सुरुवातीला 18 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड काही तासातच रद्द करण्यात आली होती. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, महायुतीतील तणावानंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती.


भरत गोगावलेंची भाषा सौम्य
मात्र, आता महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील ध्वजारोहण सोहळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आदिती तटकरे यांच्याचहस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर, नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्याहस्ते ध्वजारोहण होईल. भरत गोगावले यांची देखील भाषा जरा मवाळ झाल्याचे पाहायला मिळाले. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला तर ठीक नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे गोगावले म्हणाले.