Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून काश्मिरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय.त्यासाठी एकनाथ शिंदेंनी श्रीनगरमध्ये जाऊन स्वत: रक्तदान केलंय.शिवसेनेकडून काश्मिरात एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र विरोधकांनी काश्मिर दौ-यावरून शिंदेंना टोला लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काश्मिर दौरा सध्या चर्चेत आहे.शिवसेनेकडून काश्मिरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय.या शिबिरासाठी एकनाथ शिंदेंनी श्रीनगर गाठलं. या शिबिरात जाऊन स्वत: एकनाथ शिंदेंनीही रक्तदान केलंय.
एकनाथ शिंदेंचं श्रीनगरमध्ये स्वागत करण्यात आलंय. तिथल्या स्थानिक महिलांनी शिंदेंना राखी बांधून त्यांचं औंक्षण केलंय. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी शिंदेचं स्वागत करण्यात आलं.श्रीनगरध्ये शिवसेनेकडून शिंदेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजीही करण्यात आलीय.
दरम्यान पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या आदिल या तरुणाच्या कुटुंबीयांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. या कुटुंबाला एकनाथ शिंदेंनी मदतही केली होती. एकनाथ शिंदेंच्या जम्मू-काश्मीर दौ-यावर खासदार संजय राऊतांनी टीका केलीये. महाराष्ट्रात काहीही काम नसल्यानं ते काश्मीरला जात आहेत, अशी टीका राऊतांनी केलीये.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्ल्यानंतरही एकनाथ शिंदे तातडीनं जम्मू काश्मिरला गेले होते. पहलगामच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आदिलच्या कुटुंबीयांशी एकनाथ शिंदेंनी संवाद साधला होता. मदत करण्याचं आश्वासनही शिंदेंनी दिलं होतं. आता पुन्हा एकदा रक्तदान शिबिरासाठी एकनाथ शिंदे काश्मिरमध्ये गेले. त्यामुळे शिंदेंच्या काश्मिर दौ-याची चर्चा होतीय.
FAQ
1. एकनाथ शिंदेंनी काश्मीरमध्ये काय केले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, स्वतः रक्तदानही केले आहे.
2. हे शिबिर कुठे आणि कधी आयोजित करण्यात आले?
हे शिबिर श्रीनगर येथे आयोजित करण्यात आले असून, शिंदे यांनी यासाठी नुकताच भेट दिली.
3. एकनाथ शिंदेंचे स्वागत कसे झाले?
श्रीनगरमध्ये स्थानिक महिलांनी शिंदे यांना राखी बांधून औक्षण केले, तसेच शिवसेनेने बॅनरबाजी करून त्यांचे स्वागत केले.
4. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी शिंदेंचा संबंध काय?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आदिल या तरुणाच्या कुटुंबाला शिंदे यांनी भेट दिली आणि मदत केली होती.
5. शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाला मदत कशी केली?
शिंदे यांनी कुटुंबाला आर्थिक आणि भावनिक आधार देऊन मदत केली, तसेच मदतीचे आश्वासनही दिले होते.
6. संजय राऊतांनी शिंदेंवर काय टीका केली?
खासदार संजय राऊतांनी शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्रात काम नसल्याने ते काश्मीरला जात आहेत.
7. शिंदे यांचा पहलगाम हल्ल्यानंतरचा दौरा कसा होता?
हल्ल्यानंतर शिंदे यांनी तातडीने जम्मू-काश्मीरला भेट दिली आणि मृतांच्या कुटुंबांशी संवाद साधला होता, आता रक्तदान शिबिरासाठी पुन्हा गेले आहेत.
8. महारक्तदान शिबिराचा उद्देश काय आहे?
हे शिबिर सामाजिक बांधिलकी दर्शवण्यासाठी आणि गरजूंना रक्त पुरवठा करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.
9. या दौऱ्याची चर्चा का होत आहे?
शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी, रक्तदान आणि विरोधकांची टीका यामुळे हा दौरा चर्चेत आहे.