Pune Water Tank News: पुण्यात बोपोडीत नव्याने बांधलेल्या पाणी टाकीचंएकदा नव्हे तर चक्क 4 वेळा उद्घाटन होतंय. आणि विशेष म्हणजे विकाम कामाचं श्रेय लाटण्यासाठी एवढी चढाओढ सुरू आहे की प्रत्यक्षात टाकीतून पाणी पुरवठा अद्यापही सुरूच झालेला नाही.त्यामुळे पाणी न पुरवठा होणाऱ्या टाकीची चांगली चर्चा रंगलीय.
रितसर स्टेज टाकून उद्घाटन
पुण्यातील बोपोडीत मधील नव्याने भरलेली 30 लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी शहरात चर्चेचा विषय ठरलीय. मात्र टाकीची चर्चा इतकी रंगली आहे की या टाकीच्या बांधकामाला ऐतिहासिक काम म्हणून पोस्टरबाजी सुरू आहे. एवढंच नाही तर या टाकीचे उद्घाटन चार वेळ करण्यात आले.राष्ट्रवादीने कालच नारळ फोडून पेढे वाटून या जलकुंभाचे पहिले उद्घाटन उरकून टाकले तर कांग्रेसनं प्रतिकात्मक उद्घाटन केलं.तर महायुतीचा घटक पक्ष असलेला रिपाई गट आज रितसर स्टेज टाकून उद्घाटन करणार आहे.
पाणी पुरवठा सुरू झाल्यावरच अधिकृत उद्घाटन
पण ज्या पुणे मनपाने ही पाण्याची टाकी बांधलीय ती माञ या श्रेयवादात कुठेच नसणार हे.आम्ही टाकीतून प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू झाल्यावरच अधिकृत उद्घाटन करू, अशी माहिती पालिकेनं कळवलीय.
पुणेकरांची फूल टू करमणूक
पण त्याधीच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपाईने बोपोडी चौकात उद्घाटनाच्या श्रेयवादाची बँनरबाजी करून पुणेकरांची फूल टू करमणूक चालवलीय…तर राजकीय नेत्यांमध्ये श्रेय वादासाठी चळवळ सुरू आहे. विशेष म्हणजे आज रिपाईच्या उद्घाटनाला भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी पञ लिहून विरोध दर्शवलाय.
FAQ
1. बोपोडीत नव्याने बांधलेली पाणी टाकी कोणती आहे?
बोपोडीत नव्याने बांधलेली 30 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे, जी पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
2. या टाकीचे उद्घाटन किती वेळा झाले?
या टाकीचे उद्घाटन आतापर्यंत चार वेळा झाले आहे, ज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपाई यांनी स्वतंत्रपणे उद्घाटन केले.
3. उद्घाटनाची प्रक्रिया कशी पार पडली?
राष्ट्रवादीने नारळ फोडून पेढे वाटून पहिले उद्घाटन केले, काँग्रेसने प्रतिकात्मक उद्घाटन केले, तर रिपाई गट आज रितसर स्टेज टाकून उद्घाटन करणार आहे.
4. पाणी टाकीतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे का?
नाही, सध्या या टाकीतून पाणीपुरवठा सुरू झालेला नाही, ज्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
5. पुणे महापालिकेची भूमिका काय आहे?
पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे की टाकीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच अधिकृत उद्घाटन होईल, आणि सध्या ती या श्रेयवादात सहभागी नाही.
6. उद्घाटनावरून श्रेयवाद का सुरू आहे?
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपाई या राजकीय पक्षांमध्ये बांधकामाचे श्रेय लाटण्यासाठी चढाओढ सुरू आहे, ज्यामुळे बॅनरबाजी आणि वाद निर्माण झाले आहेत.
7. रिपाईच्या उद्घाटनाला विरोध का आहे?
रिपाईच्या उद्घाटनाला महायुतीतील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पंक्ती लिहून विरोध दर्शवला आहे, ज्यामुळे राजकीय तणाव वाढला आहे.
8. या वादामुळे स्थानिकांना काय परिणाम भोगावा लागत आहे?
पाणीपुरवठा नसताना सतत होणारी उद्घाटने आणि श्रेयवादामुळे पुणेकरांमध्ये नाराजी आणि हास्यास्पद वाटणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
9. महापालिकेच्या पुढील योजना काय आहेत?
महापालिका पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत अधिकृत उद्घाटन टाळणार असून, तांत्रिक तयारी पूर्ण झाल्यावरच पुढील निर्णय घेणार आहे.