बेल्जियममध्ये गणेशोत्सवात होणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना: महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने पुण्यातून अडीच फुटांची मूर्ती बेल्जियमला रवाना – Pune News



गणपती बाप्पा मोरया आणि श्रीमंत दगडुशेठ गणपती की जयचे जयघोष आता बेल्जियममध्येही निनादणार आहेत. महाराष्ट्र मंडळ बेल्जियम आणि शिरीष वाघमारे यांच्या पुढाकाराने बेल्जियममध्ये दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात यंदा प्रथमच श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या

.

ही अडीच फूट उंचीची मूर्ती पुण्यातील मंदिरात विधिवत पूजन करून नुकतीच महाराष्ट्र मंडळ बेल्जियमच्या सदस्यांकडे ट्रस्टतर्फे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमात उपक्रमाचे संयोजक शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे आणि रोहित लोंढे उपस्थित होते.

पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी साकारली. शिरीष वाघमारे, तृप्ती वाघमारे यांसह इतर सदस्यांनी ही मूर्ती स्वीकारली. जगातील १७५ देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून बेल्जियममधील भारतीयांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.

शिरीष वाघमारे म्हणाले, “श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचे बेल्जियममध्ये आगमन हा महाराष्ट्र मंडळ बेल्जियमचा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय आणि महाराष्ट्रीय बांधवांसाठी गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. यानिमित्ताने श्रद्धा आणि संस्कृतीचा सुवास थेट महाराष्ट्रातून बेल्जियममध्ये पोहोचणार आहे.”

महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, “आता विश्वात्मके देवे, हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे वाक्य खऱ्या अर्थाने साध्य होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे.” बेल्जियममध्ये जवळपास अडीच हजार मराठी बांधव सक्रिय असून २० ते २५ हजार भारतीय नागरिक उत्सवात सहभागी होतात. लोकमान्य टिळकांची समाज एकसंध होण्याची भावना भारतासह परदेशातही घडत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24