मृतक – शशांक गजभिये व टिंकू (वसीम) खान
भंडारा शहरात शनिवारी रात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. रात्री उशिरा दुकानात बसलेल्या एका तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दुसऱ्या तरुणावर देखील आरोपींनी वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, हल्
.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून दोघांचा खून केल्या गेल्याची घटना शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान भंडारा येथील गजबजलेल्या मिस्कीन टैंक परिसरात घडली होती. या घटनेत टिंकू उर्फ वसीम खान (35) आणि शशांक गजभिये (22) या दोघांचा कुऱ्हाड आणि चाकूचे घाव घालून खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी रात्रीच फैजान शाकीर शेख (24), साहिल शाकीर शेख (22), आयुष मुन्ना दहिवले (19, तिघेही रा. भंडारा) व प्रीतम विलास मेश्राम (33, रा. शहापूर) या चार आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी मोहम्मद यासिन शेख ( 29,रा. अशरफी नगर, तकिया वार्ड, भंडारा) यांच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी यांनी मृतक हे फिर्यादीचे दुकानात बसले असता, लहान कुऱ्हाड व चाकू घेवून टिंकू याचे मागे धावून गेले. मृतक टिंकूला जमिनीवर पाडून कुऱ्हाड व चाकूने मारत असताना शिवीगाळ करीत होते. साहील व फैजान शेख से दुश्मनी करोंगे तो जान से जाओगे. कुत्ते की तरह दौडा-दौडाकर मारेंगे असे जोरात बोलत आरोपी साहिलने लहान कुऱ्हाडीने आणि फैजान व त्याच्या साथीदारांनी चाकूने टिंकूच्या शरीरावर वार केले. दरम्यान, टिंकू याला वाचवण्याकरता शशांक गजभिये हा गेला असता, तेव्हा चारही आरोपींनी शशांकलाही चाकू व कुऱ्हाडीने मारुन खाली पाडले.
विशेष म्हणजे, चारही आरोपींनी अत्यंत निर्दयपणे दोघांवरही घाव घातले. ते निपचित पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळेपर्यंत ते दोघेही तसेच पडून होते. काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही रुग्णालयात पाठविले. दरम्यान. वसीम खान व शशांक गजभिये यांचे मरणास कारणीभुत झाले असल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायवरुन चारही आरोपींविरुद्ध अपराध क्र.1070/2025 कलम 103(1),352,3(5) भा.न्या.सं. सहकलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
हल्ल्याचे नेमके कारण काय?
स्थानिक सूत्रांनुसार, टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादातून ही दुहेरी हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे. रविवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन तपास केला आणि महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार आरोपींची चौकशी सुरू असून, या हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिस करत आहेत.