देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागले आहेत. आमचा काही लॉस नाही पण सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी सावध होणं गरजेचे आहे. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे, मुद्दाम मराठा अधिकारी संपवण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून क
.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सगळ्या मंत्र्यांना त्यांनी स्वत:चे एक-एक ओएस डी दिले आहेत. प्रत्येक खात्यामध्ये काय काम सुरू आहे त्यांची माहिती घेतली जात आहे. इतकं बे भरवश्याचे माणूस असतो का? ते तुमच्या पक्षात आले आहेत ना? तरी ओएस डी ठेवला आहे, यावरुन फडणवीस किती आतल्या गाठीचे आहे हे कळते.
मराठ्यांची दशा झाली
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भाजप वेगळा पक्ष होती आणि आता यांनी वेगळाच करुन ठेवला आहे.सत्तेवर येण्यासाठी भाजपमध्ये कधीच येऊ न शकणाऱ्या नेत्यांनी त्यांनी भाजपसोबत आणले. नारायण राणे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे लोक तिकडे जाऊ शकत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तिकडे नेले. अशोकराव चव्हाण सारखा मुख्यमंत्री राहिलेला माणूस तिकडे जाऊ शकत नाही, पण यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला लावला.काँग्रेसमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या नेत्यांनी काय केंद्रीय गृहमंत्री पाहिले नाही का? पाहिले ना शिवराज सिंह पाटील पाहिले, सुशीलकुमार शिंदे पाहिले. पण आता त्यांना भाजपमध्ये जावे लागलं ही दशा आहे मराठ्यांची. मीडियासमोर ते काही बोलणार नाही पण सर्वांना माहिती आहे की हा माणूस सर्वांना संपवतो आहे.
भाजपमधील लाेक फडणवीसांना त्रासले
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील लोकांनाही संपवले. सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे यांची खूप फजिती केली आहे. नितीन गडकरी यांची इतकी फजिती केली की त्यांनी दिल्ली न सोडण्याचा निर्णय घेतला.फडणवीस सत्तेसाठी त्यांच्याच लोकांना लाथाडतात. पक्षातील लोक त्यांना त्रासले आहे. भाजपचे काही जण मला फोन करतात आणि सांगतात बिले अडकले आहेत म्हणून बैठकीला येता येत नाही पण आम्ही मुंबईच्या मोर्चात नक्की सोबत राहू.
ओबीसी पालकमंत्री मराठा आमदारांना त्रास देतात
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसीचे जिथे मंत्री केले आहेत ते भाजप च्याच मराठा आमदारांना त्रास देत आहे, अशी परिस्थिती जालन्यात दिसून येत आहे. अशाने कसा पक्ष वाढणार, पक्षातील लोक नाराज होत आहेत. ओबीसी मंत्री झाले तिथे मराठा आमदारांना त्रास देत आहेत. आमचे मराठा पालकमंत्री कुणाला त्रास देतात का? मला सत्ताधारी 30 ते 32 आमदार-खासदारांचे फोन आले.