दिंडोरी शिवारातील बदादे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जनाबाई जगन बदादे वय 65 मयत शेतकरी महिलेचे नाव आहे. शेतात कामे करत असताना बिबट्याने महिलेवर हल्ला करून तिला उसात ओढून नेले.
.
दरम्यान, दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून, मयत महिलेचे नातेवाईक ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणत संताप व्यक्त केला. तसेच नाशिक कळवण रस्त्यावर मृतदेह ठेवत रास्ता रोको केला. पोलिस आणि नातेवाईक यांच्यात संघर्ष सुरु झाला. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. सुमारे दीड तास रास्ता रोको सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

संतप्त नागरिकांची समजूत काढताना पोलिस.
शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला
याबाबत अधिक माहिती अशी की, जनाबाई जगन बदादे (६५) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या नाव आहे. आपल्या शेतातील घराजवळ शेतात कोथिंबीर काढणी करत असताना शेजारच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला व उसात ओढून नेले. आजीने हल्ला होताच आरडा ओरड केल्याने, त्यांचा मुलगा संजय व इतर नातेवाइकांनी धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र या या हल्ल्यात आजीचा मृत्यू झाला.
वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू
ऐन रक्षाबंधन, जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी झालेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, वन विभागाने बिबट्या शोध मोहीम राबवत पिंजरे लावण्याची मागणी होत आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांनी तातडीने रेस्क्यू टीम बोलावत बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
हे ही वाचा…
ताई सकाळी राखी बांध, गिफ्ट देईन:पण बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षांच्या आयुषचा मृत्यू, बहिणीने थंड हातावर राखी बांधून दिला अखेरचा निरोप
नाशिक जिल्ह्यातील वडनेर गावात रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गावातील तीन वर्षांचा आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या सणाआधीच गावावर शोककळा पसरली. आयुषची दहा वर्षांची बहीण श्रेयाने अंत्यसंस्कार करण्यापूर्वी भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याला अखेरचा निरोप दिला. हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले. ग्रामस्थांनी जड अंतकरणानं चिमुकल्या आयुषला अखेरचा निरोप दिला. सविस्तर वाचा…