Hidden Places In Mumbai Kalamb Beach : मुंबईचे सर्वच समुद्र किनाऱ्यांवर नेहमीच गर्दी असते. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फिरताना आनंद वाटतो. पण, एकांत आणि मनाला शांती मिळत नाही. अशा वेळेस मुंबईच्या अगदी जवळ असलेले हा सिक्रेट समुद्र किनारा फिरण्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. मुंबई आणि ठाण्याच्या जवळ सुंदर समुद्र किनारा आहे. इथं फिरताना कोकणातील सुंदर समुद्र किनाऱ्याचा फिल येतो. या छुप्या पर्यटन स्थळाला एकदा तरी नक्की भेट द्या.
मुंबईच्या अगदी जवळ असलेले हा समुद्र किनारा पश्चिम उप नगरातील नालासोपारा येथे आहे. नालासापोरा स्टेशनपासून अगदी जवळच हा समुद्र किनारा आहे. कळंब बीच असे या समुद्र किनाऱ्याचे नाव आहे. हे ठिकाण फारसे कुणाला माहित नाही. यामुळे येथे येणाऱ्या पर्टकांची संख्या खूपच कमी आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा हा समुद्र किनारा आहे.
नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात हा समुद्र किनारा आहे. अगदी गावात पोहचलो तरी पुढे इतका सुंदर आणि अथांग समुद्र किनारा पहायला मिळेल याची पर्यटकांना कल्पना येत नाही.
कळंब गावातून आता गेल्यावर गावाची हद्द संपली की हा समुद्र किनारा सुरु होतो. समुद्र किनाऱ्यावर कांदळवन आणि छोटसं सुरुचं बन देखील आहे. या समुद्र किनाऱ्यावरची वाळू ही चंदेरी रंगाची आहे. या समुद्राचे पाणी देखील स्वच्छ आहे. समुद्र किनाऱ्यावर फेटफटका मारताना एका बाजूला वसईचे दृष्य दिसते. तर, दुसऱ्या बाजूला डहाणू, पालघरचे समुद्र किनारे दिसतात. येथे अप्रतिम असा सनसेट पहायला मिळतो. येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसल्यामुळे या समुद्र किनाऱ्याजवळ हॉटेल्स किंवा खाद्यापदार्थांची दुकाने नाहीत.
या सिक्रेट समुद्र किनाऱ्यापर्यंत जायचे कसे?
नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात हा कळंब हा समुद्र किनारा आहे. कळंब गावाच्या नावावरुनच या समुद्र किनाऱ्याला कळंब बीच हे नाव पडले आहे. येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानाकात उतरावे लागते. रेल्वे स्थानाकातून बाहेर पडल्यावर पश्चिमेला कळंब हे गाव आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनबाहेरुन कळंब गावात जाण्यासाठी वसई विरार परिहवन सेवेची बस पकडू शकता. याशिवाय रिक्षाने देखील जाता येते. रिक्षाने गेल्यास रिक्षा थेट समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहचवते.
FAQ
1. कळंब बीच कुठे आहे?
उत्तर: कळंब बीच हे मुंबई आणि ठाण्याच्या जवळ, नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात आहे. हा समुद्र किनारा नालासोपारा रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे.
2. कळंब बीचला का सिक्रेट समुद्र किनारा म्हणतात?
उत्तर: कळंब बीच फार कमी लोकांना माहित आहे, त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी खूप कमी असते. यामुळे हा एक शांत आणि छुपा पर्यटन स्थळ आहे, ज्याला सिक्रेट समुद्र किनारा म्हणतात.
3. कळंब बीचची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
उत्तर: कळंब बीच अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. येथील वाळू चंदेरी रंगाची आहे, समुद्राचे पाणी स्वच्छ आहे, आणि किनाऱ्यावर कांदळवन आणि सुरुचे बन आहे. येथून वसई, डहाणू, आणि पालघर येथील समुद्र किनारे दिसतात, तसेच अप्रतिम सूर्यास्त पाहता येतो.