नागपुरातील कोराडी मंदिराचे गेट कोसळले: 17 कामगार जखमी असल्याची माहिती, अनेकजण दबले गेल्याची भीती; मदतकार्य सुरू – Nagpur News



नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील कोराडी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी मंदिराचा निर्माणाधीन भव्य प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त

.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सोबतच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य राबवण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 17 मजूर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेसंदर्भात अद्याप मंदिर प्रशासन आणि रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नागपूरचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे हे स्वतः या मंदिराचे अध्यक्ष आहेत. बावनकुळे प्रशासनाच्या संपर्कात असून घटनेचे अपडेट घेत आहेत.

जखमींना बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंदिराच्या गेट नंबर 4 जवळ घडली आहे. या घटनेनंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला तात्काळ मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर काय म्हणाले?

या घटनेबाबत बोलताना नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर म्हणाले- गेटचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये काही मजूर अडकले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आम्हाला पालकमंत्र्यांचा फोन आला होता, त्यानुसार आम्ही काम करत आहोत. आता गेटखाली कोणीही नाही, अशी अपेक्षा आहे.

परिस्थिती नियंत्रणात

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले- पोलिस गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गेटखाली अजून कुणी दाबल्या गेलं आहे का? याची खात्री पोलिसांकडून केली जात आहे. तसेच, या ठिकाणची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

दरम्यान, जखमी मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची नावे कळू शकली नाहीत. या प्रवेशद्वाराचे कंत्राट बिव्हिजी कंपनीकडे असल्याचे कळते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24