वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव: हल्ली सध्या कोण काय करेल याचा नियम नाही. तुमच्यासोबत कधी एकदा व्यक्तीने फोटो काढला आणि फोटो दाखवून इतरांना लुबाडण्याचा प्रकार केला तर? जळगावत हा प्रकार घडलेला आहे. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेला फोटो दाखवून अनेक लोकांना लुबाडल्याचा प्रकार समोर आलाय.
जळगावातले बंटी – बबली
बंटी – बबली या हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना जळगावात समोर आली असून जळगावातील एका दांपत्याने तब्बल 20 ते 21 जणांची 55 लाख 60 हजारात फसवणूक केली आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याच सांगून एका दांपत्याने जळगावातील तब्बल 20 जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
किती जणांना लुटलं?
रेल्वेत नोकरी लाऊन देतो, म्हाडामध्ये फ्लॅट देतो, रेल्वेत टेंडरचे काम करतो अशी वेगवेगळे आमिष दाखवून 20 जणांची तब्बल 55 लाख 60 हजारात फसवणूक या दाम्पत्याने केली आहे. हितेश रमेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता संघवी अशी फसवणूक करणाऱ्या दांपत्याचे नाव आहे. याप्रकरणी जळगावातील शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
कशी करायचे लूट?
जळगाव शहरातील जुने गावातील विठ्ठल पेठेत राहणारे हर्षल शालीग्राम बारी यांच्यासह 20 जणांची फसवणूक झाली आहे. 23 नोव्हेंबर 2024 ते 8 ऑगस्ट 2025 या आठ महिन्यात एकूण 55 लाख 60 हजार रुपयात फसवणूक झाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून त्यासाठी बनावट ओळखपत्र, बनावट लेटरपॅड आणि अपॉइंटमेंट लेटर दाखवून सर्वांचा विश्वास संपादन केल्याचे समोर आले आहे.
आपल्या मुलाला मुलीला रेल्वेत टीसी ची तसेच इतर पदावर नोकरी लावून देण्याचे , रेल्वेत गाडी लावून देण्याचे तसेच टेंडर मिळवून देण्याच्या अपेक्षेने अनेकांनी संघवी दांपत्याला पैसे दिले कुठल्याही काम झालं नाही, तसेच दाम्पत्यांनी फोनवर उडवून ची उत्तर देत असल्याने तसेच त्यांचे फोन बंद झाल्यानंतर फसवणूक झाल्याचं नागरिकांच्या लक्षात आले, त्यानंतर संबंधितांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेत तक्रार केली.
‘आमचे पैसे आम्हाला परत द्या’
कर्ज काढून दागिने मोडून अनेकांनी नोकरीच्या कामाच्या अपेक्षेने दांपत्याला पैसे दिले त्यामुळे दोघांना लवकरात लवकर अटक करून आमचे पैसे आम्हाला परत मिळावे अशी मागणी तक्रारदार नागरिकांनी केली आहे. गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून संघवी दांपत्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी असून त्यादृष्टीने त्यांच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे.
FAQ
१. जळगावात कोणत्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे?
जळगावात हितेश रमेश संघवी आणि त्यांची पत्नी अर्पिता संघवी या दांपत्याने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे भासवून 20 ते 21 जणांची 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली.
२. या दांपत्याने फसवणूक कशी केली?
संघवी दांपत्याने रेल्वेत नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट आणि रेल्वे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी बनावट ओळखपत्र, लेटरपॅड आणि अपॉइंटमेंट लेटर दाखवून लोकांचा विश्वास संपादन केला आणि पैसे लुबाडले.
३. फसवणुकीचा कालावधी आणि रक्कम किती होती?
23 नोव्हेंबर 2024 ते 8 ऑगस्ट 2025 या आठ महिन्यांत दांपत्याने 20 जणांकडून 55 लाख 60 हजार रुपये लुबाडले.