मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी नेटवर्क फेल झाल्याने सर्व प्रणाली ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया तात्पुरती मॅन्युअल पद्धतीने सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रणालीत बिघाड
.
यासंदर्भात एअर इंडियाने X पोस्ट करत लिहिले की, थर्ड-पार्टी डेटा नेटवर्क आउटेजमुळे मुंबई विमानतळावरील चेक-इन सिस्टीमवर परिणाम झाला, ज्यामुळे एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांच्या उड्डाणांना विलंब झाला. त्यानंतर ही सिस्टीम पुनर्संचयित करण्यात आली आहे, तथापि, परिस्थिती हळूहळू सामान्य होत असताना आमच्या काही उड्डाणांवर काही काळ परिणाम होऊ शकतो.
खाजगी विमान कंपन्यांना मोठा आर्थिक फटका
या तांत्रिक समस्येमुळे इंडिगो, एअर इंडिया, अकासा, विस्तारा यांसारख्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उड्डाणे उशिराने होत असल्याने प्रवाशांनाही अडचणी येत आहेत. सिस्टीम पूर्ववत होईपर्यंत गर्दी वाढतच जाण्याची शक्यता आहे.
आयटी विभाग दुरुस्तीसाठी प्रयत्नशील
विमानतळाचे आयटी आणि कोर टीम तातडीने बिघाडाचे कारण शोधून नेटवर्क दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व विभागांना आपत्कालीन नियमांनुसार (SOP) काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व सिस्टीम लवकरच पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना या मॅन्युअल प्रक्रियेमुळे विलंब आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी सिस्टीम अचानक क्रॅश झाल्याचे सांगितले जात आहे.