Mahendra Saklecha car seized: कबूतरांना कारवर ट्रे ठेवून दाणे खाऊ घालणाऱ्या महेंद्र सकलेचाची गाडी जप्त करण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात महेंद्र सकलेचावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसानी सकलेचावर गुन्हा दाखल करत गाडी जप्त केली आणि नोटीसही दिली आहे. हायकोर्टाच्या नियमांचे उल्लघन करणाऱ्या महेंद्र सकलेचावर पोलिसांनी कारवाई केलीय.
काय आहे नेमकं प्रकरण?
राज्यात सध्या कबुतरखान्यांवरील बंदीवरून वातावरण पेटलंय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणी कबुतरखाने बंद केलेत. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखानाही बंद कऱण्यात आलाय. कबुतरांना दाणे न टाकण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. मात्र काही जण आता कोर्टाचे आदेशही पायदळी तुडवतायत. दादरच्या कबुतरखान्याजवळ एका व्यक्तीने आपल्या गाडीच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. आणखी 12 वाहनं आणून कबुतरांना खाद्य टाकणार अशी मुजोरीही खाद्य टाकणा-याची पहायला मिळाली.
विरोधकांकडून टीका
कोर्टाने कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर जैन समाज आक्रमक झाला. जैन समाजाने कबुतरखान्याच्या ठिकाणी आंदोलनही केलं. दादरच्या कबुतरखान्यासमोरचं जैन देरासर आहे. कबुतरांना दाणे टाकण्यासाठी जैन धर्मीय आग्रही आहेत मात्र देरासरमध्ये कबुतर घुसू नये म्हणून देरासरला जाळी लावण्यात आलीये. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवलीये.
दादरमधील कबुतरखाना बंद होऊ नये साठी मंत्री मंगलप्रभात लोढांनी पुढाकार घेत कबुतरखाना बंद करू नये अशी मागणी व्यक्त केलीये. तर घटकपक्षातील शिवसेनेने मात्र वेगळीच भूमिका मांडलीये.
कायद्याचं उल्लंघन
दरम्यान हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीने जोर धरला होता. ही बातमी झी 24 तासने लावून धरली होती. अखेर या आंदोलकांवर कारवाई करण्यात आलीय…कारवर कबुतरांना खाऊ घालणाऱ्या महेंद्र सकलेचा गाडी शिवाजी पार्क पोलिसांनी जप्त करत गुन्हाही दाखल केलाय. हायकोर्टाचा आदेश असतानाही कायद्याचं उल्लंघन करत कबुतरांना खायला दिलं जात होतं. कोर्टाचा अवमान केला जात होता. कायदा काहीही करू शकत नाही असा अविर्भात असलेल्या महेंद्र सकलेचावर आता कायद्याचा बडगा बसलाय.
FAQ
1) दादर कबुतरखान्यावर बंदी का घालण्यात आली आहे?
मुंबई हायकोर्टाने कबुतरांना खाद्य देण्यामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांमुळे (जसे की श्वसनाचे आजार, कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे रोग) आणि सार्वजनिक त्रासामुळे 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील सर्व कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे.
2) वाहनांद्वारे खाद्य देणे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे का?
होय, हायकोर्टाने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास स्पष्ट बंदी घातली आहे. वाहनांद्वारे खाद्य देणे हे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे आणि यासाठी दंड किंवा एफआयआर दाखल होऊ शकते.
3) स्थानिक नागरिकांचा याला विरोध का आहे?
स्थानिकांचे म्हणणे आहे की कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार (जसे की हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस) होतात, सार्वजनिक ठिकाणे घाण होतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांनी कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती.