बारामती विमानतळावर पुन्हा विमान अपघात: उड्डाणानंतर चाक निखळले, पायलटकडून इमर्जन्सी लँडिंग; दोन वर्षांत तिसरी दुर्घटना, जीवितहानी नाही – Pune News



बारामती विमानतळावर शनिवारी सकाळी ७:४५ वाजता विमान अपघाताची घटना घडली. रेड बर्ड एव्हिएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाने नेहमीप्रमाणे प्रशिक्षण उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच पुढील टायरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन टायर वाकड

.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पायलट विवेक यादव यांनी उड्डाण घेतले होते. थोड्या उंचीवर गेल्यानंतर विमानाच्या पुढील चाकात प्रथम तांत्रिक बिघाड होऊन ते वाकडे झाले आणि नंतर पूर्णपणे निखळले. पुढील चाक निखळल्याचे लक्षात आल्यानंतर विवेक यादव यांनी तातडीने आपत्कालीन (एमर्जन्सी) लँडिंग केले. लँडिंगवेळी विमान टॅक्सीवे सोडून थेट बाजूच्या गवतात घसरले. या प्रक्रियेत विमानाच्या पंखांना नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विमान सुरक्षितपणे बाजूला हलवून दुरुस्तीचे काम सुरू केले. सुदैवाने या प्रकारात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, रेड बर्ड एव्हिएशनने अद्याप या घटनेवर कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.

दोन वर्षांतील तिसरा अपघात

विशेष म्हणजे, रेड बर्ड एव्हिएशनच्या विमानांना गेल्या दोन वर्षांत हा तिसरा अपघात आहे. त्यामुळे बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त विमान जर एखाद्या घरावर, शाळेवर किंवा औद्योगिक वसाहतीवर कोसळले असते, तर भीषण दुर्घटना घडली असती, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या संस्थेविरोधात पूर्वीपासूनच अनेक तक्रारी करण्यात आल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेण्याची भाजपची मागणी

दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “उद्या एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहराच्या नागरी वसाहतीजवळून होणारी प्रशिक्षण उड्डाणे थांबवण्यात यावीत. बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात याव्यात. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे वैभव सोलनकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सोलनकर यांनी याआधीच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रेड बर्डविषयी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24