आनंदाची बातमी! अखेर तो क्षण आलाच; बीडीडीवासियांना ‘या’ दिवशी मिळणार चाव्या


Worli BDD Chawl Residents Get New Home Keys: मुंबईच्या वरळीतील बीडीडीवासिय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर जवळ आलाय. त्यांच्या स्वप्नांची पुर्तता याच महिन्यात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 33 प्रकल्पांचा आढावा घेऊन बीडीडी चाळी आणि त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकरणावर आश्वासन दिलं होतं. जिथं बीडीडी चाळीतील 9869 पुनर्विकास सदनिकांपैकी 3888 सदनिकांचं काम प्रगतीपथावर असून, 556 सदनिकाधारकांच्या हस्तांतरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता बीडीडी वासियांना 14 ऑगस्टला चाव्या दिल्या जाणार आहेत. 

बईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या प्रकल्पांतर्गत रहिवाशांना नव्या, सुसज्ज घरांच्या चाव्या 14 ऑगस्ट 2025 रोजी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहेत. हा प्रकल्प ब्रिटिशकालीन जुन्या आणि धोकादायक चाळींचे आधुनिक इमारतींमध्ये रूपांतर करणारा असून, यामुळे रहिवाशांचे राहणीमान सुधारेल, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

वरळी बीडीडी चाळीतील एकूण 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यापैकी 556 सदनिका पहिल्या टप्प्यात तयार असून, त्या रहिवाशांना लवकरच हस्तांतरित केल्या जाणार आहेत. या 40 मजली इमारतींमधील प्रत्येक सदनिका 500 चौरस फुटांची असून, स्वच्छ पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि लिफ्ट यांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. याशिवाय, नायगाव येथील 3344 सदनिकांपैकी 864 सदनिका सप्टेंबर 2025 मध्ये आणि ना. म. जोशी मार्गावरील 1241सदनिकांपैकी 342 सदनिका डिसेंबर 2025पर्यंत हस्तांतरित होणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. म्हाडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रशासकीय अडचणी दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीला अनुपस्थित राहणे चर्चेचा विषय ठरले, कारण त्यांच्याकडे नगरविकास खाते आहे.

गणेशोत्सवापूर्वी रहिवाशांना नव्या घरात प्रवेश

आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली असून, गणेशोत्सवापूर्वी रहिवाशांना नव्या घरात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी सत्ताधारी पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची टीकाही केली. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पुनर्विकासाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

बीडीडीवासीयांसाठी आनंदाचा क्षण

हा प्रकल्प केवळ घरांचे हस्तांतरण नाही, तर रहिवाशांना सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैली प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश करणे हा बीडीडीवासीयांसाठी आनंदाचा क्षण ठरेल.

FAQ

बीडीडी चाळ पुनर्विकास योजना म्हणजे काय?

बीडीडी चाळ पुनर्विकास योजना ही मुंबईतील जुन्या बीडीडी चाळींमधील रहिवाशांना नवीन, प्रशस्त आणि हक्काच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याची राज्य सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गत वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे.

पुनर्विकास योजनेत कोणत्या ठिकाणांचा समावेश आहे?

ही योजना प्रामुख्याने मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासावर केंद्रित आहे.

नवीन सदनिकांचे हस्तांतरण कधी सुरू होणार आहे?

ऑगस्ट 2025 च्या तिसऱ्या आठवड्यापासून बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळण्यास सुरुवात होईल. यानंतर सप्टेंबर आणि डिसेंबर 2025 मध्येही सदनिकांचे हस्तांतरण केले जाईल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24