Tomato Price Hike: गृहिणींचे बजेच बिघडण्याची शक्यता आहे. कारण जेवणातील अविभाज्य घटक असलेला टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत. राज्यातील बहुतांश भागात टोमॅटोने शंभरी पार केली आहे. त्यामुळं ऐन सणासुदीच्या काळात टोमॅटो महागले आहे. टोमॅटोच्या दरवाढीचे कारण आपण जाणून घेऊयात.
उन्हाळी आणि मोसमी पावसामुळे सालाबादप्रमाणे यंदाही या हंगामात टोमॅटोच्या दरांनी उसळी घेतली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधून होणारी आवक थंडावल्याने देशभरात टोमॅटोची टंचाई जाणवत आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई या प्रमुख महानगरांत किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 70 ते 100 रुपयांवर पोहोचले आहेत.
राजधानी दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप करत स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. परंतु, मुंबईसह महाराष्ट्रातील शहरांतील ग्राहकांना टोमॅटोचे दर सोसवेनासे झाले आहेत. उन्हाळी, अवकाळी पाऊस, सरासरीपेक्षा जास्त तापमानामुळे दरवर्षी जुलै महिन्यात टोमॅटोच्या उत्पादनात घट होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेश ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत.
जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका अनेक पिकांना बसला आहे. टोमॅटोचे 30 ते 40 टक्के नुकसान झाले आहे. पावसामुळं वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. पावसात अनेकदा टोमॅटो काढणी करणे मुश्कील ठरते. त्यामुळं टोमॅटोची आवक घटली आहे. आवक घटल्याने बाजारात टोमॅटोचे उत्पादन कमी झाले आहे याचाच परिणाम म्हणून टोमॅटोचे दर वाढले आहेत.
राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळं शेतात चिखल झाल्यामुळ वाफसा तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळं एक जूनच्या दरम्यान होणाऱ्या लागवडीसाठी शेतजमिनी तयार करता आल्या नाहीत. वाफशा अभावी जूनमधील लागवडी पंधरा दिवस विलंबाने झाल्या. या सर्व कारणांमुळं टोमॅटोच्या दरात वाढ झाले आहेत.