शरद पवारांच्या गौप्यस्फोटाला आदित्य ठाकरेंचे समर्थन: म्हणाले – भाजपच्या कार्यालयातून चालतो निवडणूक आयोग, वरळीतील गोंधळावरून शिंदेंवरही निशाणा – Maharashtra News



विधानसभा निवडणुकीतील मतांची चोरी आणि निवडणूक आयोगावरच्या पक्षपातीपणाच्या आरोपांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चढ-उतार सुरू झाले आहेत. शरद पवारांच्या 160 जागा जिंकून देण्याच्या प्रस्तावाविषयीच्या विधानाचे आदित्य ठाकरे यांनी समर्थन केले असून, शर

.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीच्या आधी आमच्याकडे दोन माणसे भेटायला आली आणि 160 जिंकून देण्याचा प्रस्ताव दिला होता, असे ते म्हणाले. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता, असे असू शकते, असे म्हणत शरद पवारांच्या गौप्यस्फोटाचे एकप्रकारे समर्थन केले.

शरद पवारांचा राजकारणात मोठा अनुभव

आदित्य ठाकरे म्हणाले, शरद पवार साहेब अनेक वर्ष राजकारणात आहेत. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी आयुष्यात अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. पहिल्यांदाज मतांची चोरी उघडपणे झालेली आहे. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते, हे आता कळायला लागलेले आहे. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि ते भाजपला झोंबते, अशी टीकाही त्यांनी केली. मतांची चोरी झाली की नाही, यासाठी खुलासा पाहण्याची गरज नाही. राहुल गांधी यांनी परवा काय खरे आणि काय खोटे हे पुराव्यानिशी दाखवले आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

वरळीत झालेल्या गोंधळावर शिंदेंना सवाल

दरम्यान, शुक्रवारी मुंबईतील वरळी परिसरात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेआणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच व्यासपीठाजवळ पोहोचले आणि दोघांचेही समर्थक एकमेकांशी भिडले. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली, त्यामुळे वातावरण बिघडले. यावर आज आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना एवढी भिती होती मग वरळीत आलात का? असा सवाल एकनाथ शिंदेंना केला.

काल कोळिवाड्यात सण होता, तो साजरा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की होत होती. त्यावेळी आम्हाला शांतता पाळायची होती. त्यांचे सरकार असल्यामुळे ते आमच्या अर्बन नक्षल म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करतील. एकनाथ शिंदेंचे हे रडगाणे आहे. त्यांनी हे सगळे बंद करावे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तिथे चार-चार कॅमेरे होते. आम्ही सगळं शांत करायचा प्रयत्न करत होतो. एवढीच भीती होती, तर मग वरळीत आलात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केला.

हे ही वाचा…

शरद पवारांनी केले राहुल गांधींचे समर्थन:EC कडे स्पष्टीकरणाची मागणी; दोघांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचाही खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीसंबंधी केलेल्या आरोपांचे जोरदार समर्थन केले. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. या प्रकरणी आयोगाने राहुल यांच्याकडे शपथपत्राचा धरलेला आग्रह अजिबात योग्य नाही, असे त्यांनी आयोगाचे कान टोचताना म्हटले आहे. उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीत मागे का बसले होते, हा चर्चेचा विषय कसा होतो? असा प्रश्नही त्यांनी या प्रकरणी महायुतीवर शरसंधान साधताना उपस्थित केला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *