संमतीने सगळे झाले असेल तर तुम्ही काय बोलणार?: एकाही मुलीची तक्रार नसताना राजकारण कशाला?, एकनाथ ​​​​​​​खडसेंचा जावयाच्या प्रकरणावर सवाल – Jalgaon News



पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात जावई प्रांजल खेवलकर यांच्यावरील आरोपांवर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका तरी मुलीने तक्रार केली आहे का, की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा बळजबरी करण्यात आली? पोलिसांकडे अशी एकही तक्रार

.

खडसे यांनी त्यांच्या जावयावरील आरोपांवर बोलताना म्हटले की, एका तरी मुलीने तक्रार केली आहे का, की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला, बलात्कार झाला, तिचे फोटो काढले किंवा तिला डांबून ठेवले? अशी एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. जर हे सर्व संमतीने झाले असेल, तर त्यात तुम्ही काय बोलू शकता, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणातील घडामोडी पूर्णपणे खासगी असल्याचा दावा करत, खडसे यांनी आपल्या कुटुंबाचा यात संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

‘माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न’

खडसे यांनी या प्रकरणाला राजकारण आणि लोढा प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. माझ्या जावयाला बाहेर जाऊन डग्स घ्यायला किंवा मुलींना बोलवायला मी किंवा माझी मुलगी रोहिणीताईने शिकवले नाही. उगाच राजकारणासाठी मला बदनाम केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. विरोधकांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, तुमचे जावई किंवा मुलगे घराबाहेर गेल्यावर काय करतात, दारू पितात की अजून काही, हा त्यांचा खासगी प्रश्न असतो. कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी व्हावी, पण कोणताही पुरावा नसताना माझ्या कुटुंबाला यात ओढणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

लोढाकडे महाजन यांच्या सिड्या

एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या प्रफुल्ल लोढा यांच्याकडे आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट खडसे यांनी केला. ते पुढे म्हणाले, माझ्या विरोधात आंदोलन करून जोडे मारण्याऐवजी गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांना जोडे मारा. खडसे म्हणाले, मी एका पदाधिकाऱ्याला विचारले की आंदोलन का करत आहात? त्यावर तो म्हणाला की, वरिष्ठांचा आदेश आहे, म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन करत आहोत. अशा प्रकारे त्यांनी भाजपवर खोचक टीका केली.

केवळ नाथा भाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विषारी पिल्लांना मी मोठे केले याचे मला दुःख वाटते, मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? मग तरीदेखील रुपाली चाकणकर या कोणत्या आधारावर बोलत आहेत? माझं नाव सतत का घेता, माझा जावई आहे तो. तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळतं का? तो दारू पितो का ते? फक्त राजकारणात नाथा भाऊंना बदनाम करून हनी ट्रॅप-वरून लक्ष विचलित करणे हा उद्योग सध्या सुरू आहे. मात्र काहीही झाले तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24