‘मृत्यू””””आयुष्याचा शेवट असलातरी तो दुसऱ्यासाठी एक नवी सुरुवातठरू शकतो. छत्रपतीसंभाजीनगरमधील राठी कुटुंबाने हेचदाखवून दिले आहे. ब्रेन डेड (मेंदूमृत) झालेल्या ६० वर्षांच्या वडिलांचेअवयवदान करून त्यांची २ मुलेआणि चार भावांनी समाजापुढे एकआद
.
सोमवारी (४ ऑगस्ट) ६० वर्षांचेकिशोर राठी शहानूरमियाँ दर्गापरिसरात दुचाकीवर जाताना त्यांनाअचानक चक्कर आली. ते खालीपडले. त्यांच्या डोक्याला दुखापतझाली. पाच वर्षांपूर्वी इचलकरंजीहूनशहरात स्थायिक झालेले राठी यांनातातडीने कमलनयन बजाजरुग्णालयात दाखल केले. मात्र, मेंदूतमोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानेडॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषितकेले.अशा कठीण प्रसंगी त्यांचे चारभाऊ विजयप्रकाश, विष्णुदास,घनश्याम आणि हनुमान राठी, त्यांचीपत्नी सुनीता राठी आणि दोन मुलेऋषीकेश, प्रथमेश राठी यांनीअवयवदानाचा धाडसी आणिसकारात्मक निर्णय घेतला. डॉ.विनोद गोसावी यांनी त्यांनाअवयवदानाची माहिती दिली.कुटुंबाने कोणताही विचार न करतायाला संमती दिली.
या निर्णयामुळे राठी यांच्या दोनकिडन्या आणि एक यकृत (लिव्हर)दान करण्यात आले. त्यापैकी एककिडनी बजाज रुग्णालयातील एकारुग्णाला, दुसरी एमजीएमरुग्णालयातील एका रुग्णालाप्रत्यारोपित करण्यात आली. यकृतमात्र नागपूरमधील न्यू एरा मदर अँड चाइल्ड रुग्णालयात पाठवण्यातआले. अशा प्रकारे राठी यांनीमृत्यूनंतरही तीन रुग्णांना जीवदानदिले.या महान कार्याबद्दल रुग्णालयाने राठी यांना आदराने मानवंदना दिली. सध्या अवयवदान जागृती सप्ताहसुरू आहे. राठी यांचे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कुटुंबीयांचा एक निर्णय, तीन जणांना नवे जीवन
अवयवदान ही एक अशी प्रक्रिया आहे, जी मृत्यूलाही अमर करते. राठीकुटुंबाच्या एका धाडसी निर्णयामुळे तीन रुग्णांना एक नवे आयुष्य मिळाले.राठी यांच्या या अवयवदानाच्या निर्णयाबद्दल बजाज रुग्णालयाच्या संपूर्णटीमने त्यांना मानवंदना दिली. यात सर्जन डॉ. अजय ओसवाल, डॉ.शिवाजी तौर, डॉ. गीता फेरवानी, डॉ. अजय रोटे, डॉ. मिलिंद वैष्णव आणिसीईओ डॉ. जॉर्ज फर्नांडिस यांचा समावेश होता. अवयवदानासाठी पुढे या,असे आवाहनही रुग्णालयाने केले आहे.