Thane Police News: ठाणे पोलीस मुख्यालयातील नऊ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून यात एक महिला पोलिसाचाही समावेश आहे. कारागृहातून कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर सातपैकी दोन कैदी फरार झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृह येथून एकूण 7 कैद्यांना ताब्यात घेऊनन कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी नऊ पोलीस कॉन्स्टेबलना कैदी पार्टी ड्युटीवर नेमण्यात आले होते. या कैदी पार्टीसाठी पोलिस हवालदार गंगाराम घुले यांच्यावर पार्टी इंचार्ज म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
कळवा रुग्णालयातून कैद्यांना पुन्हा कारागृहात आणण्यात आले. यावेळी कैद्यांची मोजणी केली असता पोलिसांच्या ताब्यातील 7 कैद्यांपैकी केवळ 5 कैदी आढळले. 2 कैदी फरार असल्याचे समोर आले. या प्रकरणी कर्तव्यावर असलेल्या 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले. दरम्यान बेपत्ता कैद्यांचा ठावठिकाणा विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.
कैदी पार्टीतील सर्व पोलिस अंलदरांनी त्यांचा कोणता तरी हेतू साध्य करण्यासाठी एकमेकांशी संगनमत करुन वरिष्ठाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका यावेळी निलंबनाची करताना ठेवण्यात आला.
निलंबित केलेल्या पोलिसांची नावे
1) गंगाराम ज्ञानदेव घुले,
2) गिरीष भिकाजी पाटील
3) विलास जगन्नाथ मोहिते,
4) किशोर शिर्के,
5) अशोक विश्वंभर मुंडे
6) संदिप सुर्यकांत खरात,
7) सुनिल दिनकर निकाळजे,
8) भरत संग्राम जायभाये
9) विक्रम आनंदा जंबुरे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भिवंडीतही एक आरोपी फरार झाल्याची घटना उघडकीस आली होती. भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आणलेला खून व पोक्सोचा आरोपी बेसावध असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालयाच्या आवारातून पसार झाल्याची घटना घडली होती. फरार आरोपीचे नाव सलामत अली अन्सारी असे असून त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. एका चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोमवारी न्यायालयीन सुनावणीसाठी सलामत अली याला ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी सलामत अली याने बंदोबस्तावरील पोलिस बेसावध असल्याचा फायदा घेत न्यायालयाच्या आवारातून पोबारा केला. त्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. पण तो आढळून आला नाही.
1) ठाणे पोलीस मुख्यालयातील निलंबनाची घटना काय आहे?
ठाणे मध्यवर्ती कारागृहातून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेलेल्या सात कैद्यांपैकी दोन कैदी फरार झाल्याच्या प्रकरणात नऊ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
2) कोणत्या कारणामुळे पोलिसांना निलंबित करण्यात आले?
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून कैद्यांना परत आणताना दोन कैदी फरार झाले. यावेळी कर्तव्यात कसूर आणि वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून नऊ पोलिसांना निलंबित करण्यात आले.
3) या घटनेत किती कैद्यांचा समावेश होता?
एकूण सात कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले होते, त्यापैकी दोन कैदी फरार झाले.