प्रांजल खेवलकर प्रकरणात गोपनीयतेचे उल्लंघन?: प्रकरणातील मुलींची ओळख सार्वजनिक करणे गंभीर गुन्हा, रोहित पवारांनी साधला निशाणा – Pune News



प्रांजल खेवलकर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. प्राप्त अहवालानुसार, खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो तसेच मानवी तस्करीची माहिती आढळल्याचे चाकणकर यांनी सांगितले. मा

.

रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, चाकणकर यांच्याकडून गंभीर गुन्हा घडला आहे. पुण्यातील कोथरुड येथे दलित मुलींवर पोलिसांनी केलेल्या शेरेबाजी प्रकरणाची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. मात्र, या प्रकरणात त्यांनी मुलींची ओळख सार्वजनिक करून बीएनएस एस 72 नुसार गंभीर गुन्हा केला आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या राज्य महिला आयोगाने अजून एक नवीन प्रताप केला आहे. कोथरूडमधील ज्या मुलींवर पोलिसांनी अश्लील व जातीवाचक शेरेबाजी केली त्यांच्या घरात चुकीच्या पद्धतीने घुसून बेकायदेशीर झाडाझडती घेतली. त्या मुलींची ओळख व नाव हे आजवर सर्वांनीच गोपनीय ठेवले होते मात्र झोपेतून जागे झालेल्या महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये सदर मुलीचे नाव टाकले आहे. BNS S72 नुसार हा गंभीर गुन्हा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

आधीच खोटी कट कारस्थाने करून अडचणीत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे चारित्र्य हनन करून त्यांना पूर्णपणे नाऊमेद करण्याचं काम राज्य महिला आयोगानं केलं आहे आणि हेच ट्विट re-post करून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी देखील शोषित मुलींच्या जखमेवर मीठ चोळल. अशा या बेजबाबदार व संवेदनाहीन वागणुकीबाबत सरकारने तत्काळ महिला आयोगावर कारवाई करावी, असे म्हणत रोहित पवार यांनी कारवाईची मागणी केली आहे.

प्रांजल खेवलकर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.

याचवेळी त्यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली. राईट टू प्रायव्हसी हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. पोलिसांना कोणाचाही मोबाईल दुसऱ्या कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही. उद्या तुमचा मोबाईल घेतला, तर तो केवळ पोलीस यंत्रणा आणि कोर्ट यांनाच दाखवता येईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काहीही बोलत नाही, असे म्हणत त्यांनी रूपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांवरून नाराजी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24