वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मतदार चोरीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी राहुल ग
.
आंबेडकर म्हणाले, “निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत विविध प्रकारे हेराफेरी करून घोटाळा केला आहे. हा विषय न्यायालयात गेल्याशिवाय याचा अंतिम निकाल लागणार नाही.” त्यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीने नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्व पक्षांना पत्र लिहून एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
आंबेडकरांनी माहिती दिली की आरटीआय अंतर्गत निवडणूक आयोगाने सांगितले आहे की त्यांच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही. “सहा वाजल्यानंतर झालेले मतदान निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यासाठी एक विशिष्ट पद्धत पाळावी लागते, ती पाळली की नाही हे तपासणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
राहुल गांधींनी कर्नाटकातील एका मतदारसंघात बोगस मतदारांबाबत केलेल्या टिप्पणीचा उल्लेख करत आंबेडकर म्हणाले, “काँग्रेस पक्षाने खूप चांगले काम केले आहे. निवडणूक आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.”
आंबेडकरांनी सांगितले की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली गेल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. “पुढच्या आठवड्यात ती याचिका दाखल होईल. यात इतर सर्व पक्ष हस्तक्षेपक म्हणून सहभागी झाले तर त्याला अधिक वजन प्राप्त होईल. म्हणूनच राहुल गांधींनीही यात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.