भाजपचा मला अडकवण्याचा डाव: रोहित पवारांचे फडणवीसांकडे बोट; म्हणाले -मी कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवर बोलत नाही हा कोण लागून गेला – Amravati News



भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार हेच या मारहाणीचे मास्टरमाईंड आहेत. त्यांनी स्वतः व्हिडि

.

गोपीचंद पडळकर यांच्या सोलापूर येथील शरणू हांडे नामक एका कार्यकर्त्याला फिल्मी स्टाईलने अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अमित सुरवसे नामक कार्यकर्त्याला त्याच्या सहकाऱ्यासह अटक करण्यात आली आहे. पडळकरांनी शुक्रवारी हांडेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रोहित पवार हेच या मारहाणीचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हा आपल्याला अडकवण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे.

मी घरच्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलत नाही, मग…

रोहित पवार अमरावतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी सध्या सरकारविरोधात आवाज उठवत आहे. मी पुराव्यांसह बोलत असल्यामुळे सरकारची अडचण होत आहे आणि मी ती केलेली आहे. मी काल त्यांना व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप ते करत आहेत. पण मी काल छत्रपती संभाजीनगर येथे होतो. त्यानंतर वाशिम व आज अमरावतीला आलो. मी अजून कुठेही कुणाशी फोनवर संवाद साधला नाही. ते माझ्यावर व्हिडिओ कॉलवर बोलल्याचा आरोप करत आहेत. पण मी माझ्या घरच्यांशीही व्हिडिओ कॉलवर बोलत नाही. मग हा कोण लागून गेला?

राहिला प्रश्न ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याचा तर जो व्यक्ती कायदा सुव्यवस्था हातात घेतो, त्याच्या बाजूने आम्ही केव्हाच उभे राहत नाही. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुमच्याकडे पोलिस प्रशासन आहे. तुमच्याकडे गृहमंत्री आहे. गृहमंत्र्यांच्याच सूचनेनुसार पडळकर तिकडे गेलेत. तिकडे जाऊन हा तमाशा करून मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर एसआयटी चौकशी करा. मी स्वतः त्याची मागणी करतो. चौकशी करा. खरे काय ते लोकांपुढे आले पाहिजे. उगाच एखाद्या विषयात कुणावर अन्याय झाला असेल, मारहाण झाली असेल, तर माझी सहानुभूती त्या कार्यकर्त्यासोबत आहे.

महाराष्ट्राच्या बाजूने लढतच राहणार

मग तो कार्यकर्ता आमच्या विरोधातील असला तरी चालेल. विषय एवढाच आहे की, कुणी खोटे बोलून वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल, कुणी कितीही प्रयत्न केला तरी मला फ्रेम करू शकत नाही. कारण, या प्रकरणी काहीच चुकीचे केले नाही. मी सरकारच्या विरोधात यापुढेही बोलत राहीन. या प्रकरणी उगीचच माझे नाव घेतले जात आहे. हे योग्य नाही. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर न्यायचे असेल तर ते तुम्ही न्या. आम्ही लोकांच्या बाजूने, महाराष्ट्राच्या बाजूने लढतच राहणार, असेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

आत्ता पाहू काय आहे नेमके प्रकरण?

शरद पवार गटाच्या अमित सुरवसेने 2021 साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी शरणू हांडेने (पडळकरांचा कार्यकर्ता) त्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोघांत समेट झाला. पण अमित सुरवसेने अचानक आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शरणूचे अपहरण करत त्याला बेदम मारहाण केली. यासाठी त्यांनी पुण्यातून एक कार भाड्याने घेतली. तेथून तो सहकाऱ्यांसह सोलापुरात आला. त्याने शरणू हांडे याचे शस्त्राचा धाक दाखवून घराजवळून अपहरण केले. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास त्याला व त्याच्या साथीदारांना अटक केली. तसेच शरणू हांडेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा…

गोपीचंद पडळकरांच्या समर्थकाला मारहाण:NCP शरद पवार गटाचे कार्यकर्ते ताब्यात; रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा -पडळकर

सोलापूर – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोलापूर येथील एका कार्यकर्त्याला फिल्मी स्टाईलने अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. पडळकर यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयात जाऊन या कार्यकर्त्याची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी यासंबंधी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे नाव घेतले. यामुळे या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांत चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24