अजित पवारांकडून पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! विकास सुसाट; ‘या’ 3 महापालिकांची घोषणा


Pune Development News Big Announcement By Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी चाकणमध्ये पहाणी दौऱ्यात एक मोठी घोषणा केली आहे. पुणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये तीन महानगरपालिका केल्या जाणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं आहे. अजित पवारांनी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्येबरोबरच नागरी समस्यांची पाहणी केली.

स्थानिकांशी चर्चा करताना, चाकणमध्ये नगरपरिषद असून यामुळे विकासावर मर्यादा येत आहेत. अशाच प्रकारची बंधनं हिंजवडीमधील औद्योगिक क्षेत्रातही येत आहेत. म्हणूनच चाकण आणि हिंजवडीला नवीन महापालिका तयार केल्या जाणार आहेत. या दोन शहरांबरोबरच उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका केली जाणार आहेत. चाकणसहीत या तीनही ठिकाणच्या महापालिका कोणाला आवडो न आवडो या सर्व महापालिका होणारच असा विश्वास अजित पवारांनी बोलून दाखवला आहे.

वाहतूक कोंडीची समस्येनं स्थानिक त्रस्त

चाकण औद्योगिक क्षेत्र म्हणजेच एमआयडीसी असो किंवा आयटीपार्क असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्येही दिवसोंदिवस नागरी समस्या वाढत चालल्या आहेत. मागील काही काळापासून या ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावत असून नागरिकांचा बराच काळ ट्रॅफिक जॅममध्येच जातो अशी स्थानिकांची तक्रार आहे. 

स्थानिक समस्यांवरुन अजित पवारांबरोबरच राज्य सरकारवर टीका केली जात असल्याने हा कळीचा मुद्दा झाला आहे. म्हणूनच अजित पवारांकडून मागील काही आठवड्यांमध्ये वारंवार या भागांची पहाणी सुरु आहे. याच पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी आज नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

नक्की वाचा >> ‘आम्ही काय बिनडोक आहोत का? तुम्हालाच लय…’; अजित पवार अचानक कोणावर आणि का चिडले?

‘तुम्ही सहनशीलता दाखवली पण आता…’

यावेळी बोलता अजित पवारांनी, “आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे. त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली पण आता यातून सुटका करूयात,” म्हटलं. 

FAQ

1) अजित पवार यांनी कोणती मोठी घोषणा केली आहे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात तीन नवीन महानगरपालिका स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या महानगरपालिका चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी या भागात स्थापन केल्या जाणार आहेत.

2) या महानगरपालिका स्थापन करण्याचे कारण काय आहे?
चाकण आणि हिंजवडी या औद्योगिक क्षेत्रांमध्ये सध्या नगरपरिषदांमुळे विकासावर मर्यादा येत आहेत. वाढत्या नागरी समस्यांमुळे, विशेषतः वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महानगरपालिका स्थापन करणे आवश्यक आहे. यामुळे अधिक निधी मिळवता येईल आणि रस्ते, ड्रेनेज यासारख्या सुविधा सुधारता येतील.

3) महानगरपालिका स्थापनेबाबत अजित पवार यांचे नेमके मत काय आहे?
अजित पवार यांनी ठामपणे सांगितले की, चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगी येथे महानगरपालिका स्थापन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे विकासासाठी जागतिक बँक आणि केंद्र सरकारकडून अधिक निधी मिळवता येईल. त्यांनी म्हटले, “कोणाला आवडो ना आवडो, या महानगरपालिका होणारच.”

4) या घोषणेचे राजकीय परिणाम काय असू शकतात?
ही घोषणा पुणे आणि आसपासच्या भागातील विकासाला चालना देऊ शकते, परंतु स्थानिक पातळीवर काहींचा विरोधही होऊ शकतो. अजित पवार यांनी यापूर्वी हिंजवडीतील समस्यांवरून स्थानिक सरपंचांना खडसावले आहे, त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि प्रशासन यांच्यातील तणाव वाढू शकतो. तसेच, ही घोषणा महायुती सरकारच्या विकासाच्या अजेंड्याला बळ देणारी ठरू शकते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24