राज्यात सत्तेत सहभागी असले तरी दिल्लीच्या राजकारणात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे वजन अधिक आहे, असा ठाम दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. भाजपला केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी या दोघांची अधिक गरज असल्याचे स्
.
बच्चू कडू म्हणाले की, दिल्लीत अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त वजन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहे. कारण त्यांचे जास्त खासदार निवडून आले आहेत. भाजपला केंद्र सरकार महत्त्वाचे असून 10 ते 15 मतांचे गणात तिथे दिसून येत आहे. त्यांना राज्यात कुणाची गरज नाही कारण त्यांच्याकडे 138 चा आकडा असून 10 जण तर ते असेही आणू शकतात.उद्या बिहारमध्ये जर काही झाले नितीशकुमार किंवा नायडू यांचा जर काही झाले तर हाताशी कुणीतरी पाहिजे.
भाजपवर ठाकरे – पवारांचा अंकुश
बच्चू कडू म्हणाले की,अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जरी राज्यात भाजपसोबत असले तरी भाजपवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाच अंकुश आहे. दिल्लीतील सरकार हे फार महत्त्वाचे आहे. राज्य आणि केंद्र सरकार यापैकी जर एक सरकार निवडायचे असेल तर भाजप कोणाला वाचवेल. कुणी गेले तर फरक पडणार नाही आमची दुसरे प्यादे तयार आहे, हे भाजपचे व्यवस्थित राजकारण सुरू आहे. राज्यात शिंदेंना जी वेळ आणली आहे ती कही के इशारे कही पे जमा रहे है असा त्याचा अर्थ आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कुणाचे लक्ष नाही
बच्चू कडू म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचा दिल्ली दौरा हा राजकारणासाठी आहे. शेतकऱ्यांसाठी जर हा दौरा केला असता तर त्याचा फायदा झाला असता. रोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करत आहे, इतके लोक रोज युद्धात देखील मरत नाही. पण याचे गांभीर्य कुणाला नाही. शेतकरी मेला काय अन् जगला काय कुणाला त्यांचे काही देणं घेणं नाही. कारण वेळेवर बटेंगे तो कटेंगे नाहीतर मुसलमानाचा फतवा निघून जातो. यामध्ये राजकारण्याचे काम निघून जाते मग त्यांना शेतकऱ्यांच्या मुद्याचे काय महत्त्व राहिल.
भाजपने प्रभु रामचंद्राला फसवलं
बच्चू कडू म्हणाले की, भाजपच्या मित्रपक्षांना त्रास होता हा आजपर्यंतचा अनुभव आहे. भाजप ही दगाफटक्यातून उभी राहिली आहे. त्यांनी जनतेला आणि सोबतच्या मित्रांना सोबत दगा फटका केला आहे. भाजप ही काही कर्तृत्वाने उभी राहिलेली नाही. भावनेचा खेळ खेळून हा पक्ष उभा राहिला आहे. राम मंदिर हा मुद्दा जर त्यांच्याकडे नसता तर ते सत्तेत आले असते का? प्रभु रामचंद्राचे नाव घेऊन त्यांनाच फसवले की काय अशी व्यवस्था आहे. भाजपवाले पूर्ण चाणाक्य आहे त्यांना मित्र दोस्त असे काही नसते. आपले लक्ष पूर्ण केल्याशिवाय ते बापाला बाप म्हणत नाही.