आभाळमाया आटली;15 दिवसांपासून पाऊसच नसल्याने परिसरात पिके वाया जाण्याचे संकट: दमदार पाऊस नसल्याने नदी,नाले कोरडेठाक; रत्नापिंप्री परिसरात शेतकरी चिंताग्रस्त‎ – Jalgaon News



पावसाळा सुरू असला तरी पाऊस नसल्याने परिसरातील शेत शिवारातील ठिकाणी पिके करपू लागली आहेत. तर काही शेतात पिकांची वाढ खुंटलेली आहे. जुलै संपला ऑगस्ट सुरू झाला त्यातच श्रावणातल्या सरी बरसतील असा अंदाज असतांना श्रावणातले पंधरा दिवस उलटून नारळी पौर्णिमा आण

.

उन्हाची तीव्रता पाहता पिके दुपारी वाळलेल्या परिस्थितीत दिसून येतात ऑगस्ट म्हणजे श्रावणात सर्वत्र हिरवेगार असल्याने गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. मात्र पाऊस नसल्याने गुरांना अजून देखील कोरडाचाराच द्यावा लागत आहे काही शेतकऱ्यांचा कोरडा चारा संपत आल्याचे सांगितले जात आहे ४२ दिवसांपासून पावसा आधी देखील या पावसाळ्यात नदी, नाल्यांना पाणी आले नसल्याने शेती शिवारात सर्व नदी,नाले कोरडेच दिसून येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे अवघ्या दोन-तीन दिवसात जर पावसाने हजेरी लावली तर पिकांची स्थिती सुधारू शकते असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकऱ्यांनी शेतातील सर्व पिकांमधील अंतर मशागतीच्या कामांना आता पूर्णविराम दिला. यंदा रासायनिक, खते, बी बियाणे महागडे पावडर फवारणी करून शेतकऱ्यांच्या हाती किती येणार याची शाश्वती नसून शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडण्याची स्थिती दिसून येत आहे. लहान-मोठ्या शेतकऱ्यांना पावसाने मारलेल्या दडीमुळे कमालीचा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांसमोर असलेली अनेक संकटे डोके वर काढीत आहेत सावकारांचे कर्ज ,सरकारी कर्ज ,सरकारी बँकांचे कर्ज याबरोबरच कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न याबरोबरच मुला, मुलीचे लग्न कसे करावे अशा समस्या उभ्या राहिल्या आहेत. शासन दरबारी याचा विचार व्हावा आणि परिसरात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करून पिक विमा किंवा शासनाच्या योजना द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

काही दिवसांवर आलेल्या सणावर दुष्काळाचे सावट पावसा अभावी शेतकरी आर्थिक संकटात पिकांची वाढ खुंटली आहे. उत्पादनात कमालीची घट शेतकऱ्यांच्या बैलांच्या पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच शेतकऱ्यांच्या हाती आर्थिक चणचण असली तरी पोळा सण कसा साजरा करावा याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे पोळा सण कसा साजरा करावा या विवंचनेत शेतकरी दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24