राज्य सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी सन २०२५ च्या स्थानिक सुट्ट्यांबाबत एक महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केलं आहे. यानुसार गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशी या दिवसांची सुट्टी रद्द करुन ती सुट्टी नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन या दिवसांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना लागू असतील असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं आहे.
मुंबईह महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजनाही शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे. 18 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि 06 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, गुरुवारच्या शासन शुद्धीपत्रकानुसार यात बदल करण्यात आला आहे.नवीन बदलांनुसार, आता गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी, नारळी पौर्णिमा (शुक्रवार, 08 ऑगस्ट, 2025) आणि ज्येष्ठगौरी विसर्जन (मंगळवार, 02 सप्टेंबर, 2025) या दोन दिवसांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेले हे सुट्टी बदलाचे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅण्ड एस. नंबर पी-13/II/बी, दिनांक 5 नोव्हेंबर, 1958 मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे. हे परिपतर्क महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202508071434078707 असा आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्येही महत्त्वाचे बदल
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यादिवशी नारळी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर केल्यामुळे या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
संबंधित परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असून याबाबतचे परिपत्रक विद्यापीठातर्फे निर्गमित केले जाणार असल्याचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. नियोजित वेळापत्रकानुसार सकाळच्या सत्रात फार्मसी आणि एमएड तर दुपारच्या सत्रात एमए आणि एमकॉमच्या परीक्षा होत्या.
सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न?
राज्य सरकारने अचानक का जाहीर केली सुट्टी?
नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जन या दिवशी सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.
अचानक सुट्टी देण्यामागचं कारण काय?
18 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला आणि 06 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
महाविद्यापीठाच्या परीक्षांचे काय?
महाविद्यापीठाच्या महत्त्वाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल केले आहेत?