महायुतीच्या आघाडीतील घटक पक्षांमध्ये निधी वाटपाच्या सूत्र संदर्भात मागील महिन्यातच चर्चा झाली. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना किती निधी द्यायचा, तसेच वेगवेगळ्या विभागाच्या मागणीनुसार त्यांनी त्यांच्या तरतुदीमध्ये काही काळ गेला, याचा अर्थ ठेकेदारांना बि
.
पालकमंत्री देसाई यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या सुरक्षा दल प्रक्रिये संदर्भात पत्रकारांना माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी दोन वेळा केली. त्यावर शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. या प्रश्नावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना मातोश्रीच्या दारात कधी येऊन दिले नाही. मग इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे दिल्लीला जातात तेव्हा त्यांचे असे कोण श्रेष्ठी तेथे आहेत? दिल्लीत बसून चर्चा करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे बघावे आणि मग एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यावे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
सातारा जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण राज्यात ठेकेदारांच्या बिलांची प्रचंड अडचण सुरू आहे. तसेच सांगली ठेकेदारांनी आत्महत्या केली या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यावर शंभूराज देसाई म्हणाले, महायुतीच्या सरकारने गत महिन्यातच घटक पक्षांच्या श्रेष्ठींशी चर्चा करून निधी वाटपाचे सूत्र ठरवले आहे. या सूत्रानुसार कोणत्या विभागाला तसेच कोणत्या खात्याच्या मंत्र्यांना किती निधी वाटप करायचे याविषयी सखोल चर्चा झाली होती. त्यामुळे देयके अदा करताना काही काळ गेला असेल. जिल्हा नियोजन समितीमधून सातारा जिल्हा परिषदेला संपूर्ण निधीचे वितरण करण्यात आले आहे. तसेच पर्यटन विभाग ही वेगवेगळ्या विकास योजनांसाठी निधीचा संपूर्ण वापर करत आहे. मात्र दिव्यांग बांधवांच्या योजनांसाठी गतवर्षी निधी खर्च करण्यात आपण कमी पडलो. यंदा मात्र तसे न होता नियोजन समितीचा सर्व निधी हा त्यांच्या विकास योजनांसाठी खर्च केला जाईल, असा शब्द पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
सातारा जिल्हा परिषदेतील दिव्यांग शिक्षकांना बोगस प्रमाणपत्राच्या संदर्भाने कारवाई केली जात आहेत. प्रमाणपत्र तपासणीच्या पहिल्या टप्प्यातच ज्यांनी बोगसगिरी केली ते सापडले नाहीत. मात्र जे खरोखर दिव्यांग आहेत त्यांच्याबाबत मात्र दुजाभाव केला जात आहे असा प्रश्न उपस्थित केल्यावर शंभूराज देसाई म्हणाले, ज्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी त्यावेळी झाली नाही की आत्ता करून घेण्यात येईल आणि ज्यांची प्रमाणपत्रे बोगस असतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
आगामी गणेश उत्सवाच्या संदर्भाने सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची व जिल्हा प्रशासनाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. डॉल्बी लेझर लाइट्स या संदर्भाने निश्चित निर्णय घेऊन गणेशोत्सव काळातील अडीअडचणींवर या संदर्भाने चर्चा होईल, असे देसाई यांनी सांगितले.
योगायोगाने मंत्र्यांनी फोन उचलला, अन् काम झाले
देसाई यांची पत्रकार परिषद सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावरील दूरध्वनी वाजला तो पालकमंत्र्यांनी उचलला आणि कोण बोलतोय असे विचारले त्यावर मला जिल्हाधिकाऱ्यांशी बोलायचे आहे. माझ्या जमिनीचा सातबारा तलाठी दुरुस्त करून देत नाही असे त्यांनी सांगितले. त्यावर तुमचा गट नंबर किती? तुम्ही कुठून बोलताय अशी माहिती मंत्री देसाई यांनी विचारली. त्यावर सर्वे नंबर 219 मधील 14 मलकापूर कराड असे संबंधिताने सांगितले. तसेच माझे नाव अॅडव्होकेट एस. पी. शहा आहे असेही त्यांनी सांगितले. त्यावर मी पालकमंत्री शंभूराजे बोलतोय, मी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बसलो आहे. तुमचे काम मी करतोय. कराड प्रांत अधिकारी यांना सूचना करतो असे त्यांनी सांगितले.