राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजनाचे निर्देश दिले आहेत. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा त्यां
.
बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
वाघमारे यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ६५० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निवडणुका होत असल्याने सर्वांची जबाबदारी मोठी आहे.
निवडणूक पूर्वतयारी करताना मतदार यादी, मतदान केंद्र, मतदान यंत्रे आणि मतदार जनजागृती या चार बाबींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते.
प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार यादीचे काळजीपूर्वक विभाजन करावे असे सांगून वाघमारे म्हणाले की मतदार यादी अचूक असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या निकषांद्वारे मतदान केंद्रांचे एकत्रिकरण करता येईल.
वाघमारे यांनी सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले.
प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार मतदान यंत्रांची मागणी नोंदवावी असेही त्यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मिळण्याबाबत करार केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल.