Mumbai- Goa Highway Work: खड्डयांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झालीये. अशात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले या महामार्गाची पाहणी करणार असल्यानं ठेकेदारांची चांगलीच धावपळ उडालीये. खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर पॅचवर्क करण्यात येतंय. महामार्गाच्या रखडलेल्या पट्ट्यातील डायवर्शन सुद्धा काढण्याचे काम सुरू करण्यात आलंय.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा पनवेलमधील पळस्पे येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील महामार्गाची त्यांनी यावेळी केली. तसंच, अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी सूचनाही दिल्या आहेत. मात्र शिवेंद्रराजेंच्या दौऱ्याआधीच ठेकेदार कामाला लागले असल्याचे चित्र समोर आले आहे, गेल्या 14 वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले होते.
कांटे ते निवळी हा मुंबई गोवा महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र अद्यापही या टप्प्याचं काम रखडंल.. या टप्प्यातही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सकाळपासून प्रयत्न सुरु आहेत. मंत्री येणार म्हणून ठेकेदार सज्ज झाले आहेत. मंत्र्यांच्या दौऱ्याआधीच ठेकेदारांची लगबग सुरू असल्याचे निदर्शनास आले.
मंत्र्यांच्या दौऱ्याआधी खड्ड्यांच्या पॅचवर्क पूर्ण करण्यात येत आहेत. तर, डायव्हर्जन हटवण्यासाठी लगबग सुरू आहे. मंत्र्यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा जाहीर होताच ठेकेदारांकडून रस्ता सुस्थितीत असल्याचा दावा केला जाणार आहे.
शिवेंद्रसिंहराजे काय म्हणाले?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजचा दौरा आहे. गणेशोत्सव पूर्वी रस्ता चांगला व्हावा खड्डे राहू नयेत. सर्व्हिस रोडची कामं चांगली व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. मुंबईत बसून कागदावर काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंह राजे यांनी दिली आहे.
मंत्र्यांनी काय सूचना केल्या?
– मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी इकोफिक्स या मटेरिअलचा वापर होणार. रोडसर्च इंस्टिट्युटने याचं संशोधन केलं आहे
-पोलाद उत्पादनातील वेस्ट मटेरिअलचा वापर करून इकोफिक्स तयार करण्यात आला आहे
– मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजवण्यासाठी महाराष्ट्रात पथमच इकोफिक्स या उत्पादनाचा वापर केला जातोय
– सेंटर रोड रिसर्जचे प्रोफेसर सतिश पांडे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले याच्या समोर इकोफिक्सचे प्रात्याक्षिक दाखवणार आहेत.