दोन मंत्र्यांचे राजीनामे घेता आले असते, पण…: महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव होता, शशिकांत शिंदे यांची स्पष्ट कबुली – Nashik News



विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महा विकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मह

.

शशिकांत शिंदे यांनी महा विकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. ते म्हणाले की, जर आघाडीतील पक्ष आणि नेते एकसंध राहिले असते, तर अधिवेशनात सरकारला अधिक अडचणीत आणता आले असते. आम्हाला दोन मंत्र्यांचे राजीनामे सहज घेता आले असते, पण आमच्याच घटक पक्षांमध्ये एकी दिसली नाही, त्यामुळे ते टळले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या महायुती सरकारला ‘मस्ती’ आल्याचा आरोप करत, सरकारमधील मंत्र्यांच्या विधानांमुळे रोज त्यांच्या कारभाराची लक्तरे बाहेर पडत आहेत, असेही त्यांनी म्हटले. जर महा विकास आघाडी एकजूट राहिली, तर सरकारला अडचणीत आणण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.​​​​​​

शशिकांत शिंदे नेमके काय म्हणाले?

शशिकांत शिंदे म्हणाले की, महा-विकास आघाडीत एकवाक्यता असती तर, दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता, अशी कबुली देत आमची चूक झाली असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. आमच्या ताकदीला विभाजित करून ज्या पद्धतीने राज्यात सत्ता आली, त्याविरोधात आम्ही जर एकत्रितपणे आंदोलन केले तर सरकारला अडचणीत आणू शकतो,​​​​​​​

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर टीका

शशिकांत शिंदे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानांचा संदर्भ देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक मोठा मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. या मोर्चाच्या तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी नाशिकमधील कार्यकर्त्यांना केले.

उद्योगपतींना पायघड्या घालणारे सरकार

शशिकांत शिंदे म्हणाले की, हे सरकार उद्योगपतींना हवे ते देण्याच्या भूमिकेत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. या सरकारला सामान्य जनतेच्या आणि मराठी माणसांच्या प्रश्नांची कोणतीही फिकीर नसल्याचेही त्यांनी म्हटले. या दौऱ्यात त्यांनी पक्ष संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर अनेक तक्रारी मांडल्याचे ही दिसून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24