सांगोल्यातील खोदकामात सापडले दगडी बांधकामाचे अवशेष: शहरातील खंदक परिसरात व्यापारी संकुलाच्या खोदकामावेळी दगडी चौथरा, तटबंदी भिंत आढळली‎ – Solapur News


सांगोला शहरातील जुन्या धान्य बाजार (खंदक) परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरु असताना सोमवारी सुमारे १५ ते २० फूट खाली दगडी चौकोनी आकाराचे प्राचीन बांधकाम व पश्चिम बाजूस पूर्व-पश्चिम दिशेने तटबंद

.

सांगोला शहराचा इतिहास फार जुना व समृद्ध आहे. शहरातील भुईकोट किल्ला हा आदिलशाही, शिवशाही व मोगल साम्राज्याच्या काळात लष्करी दृष्ट्या महत्वाचे ठाणे म्हणून ओळखला जात होता. आजही या किल्ल्याचे काही बुरुज व तटबंदी शहरात उभ्या असून त्यांचा जीर्णोद्धार होण्याची प्रतीक्षा आहे. व्यापारी संकुल उभारण्यात येत असलेल्या खंदक भागालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. पाया खोदकामाच्या वेळी सापडलेले दगडी अवशेष व तटबंदीचे अवशेष नेमके कशाचे आहेत, हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. काही इतिहास अभ्यासकांनी याठिकाणी प्राचीन वास्तूचा संदर्भ असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, पुरातत्त्व विभागाने तातडीने उत्खनन करावे, अशी मागणी होत आहे.

या घटनेची माहिती पुणे येथील पुरातत्त्व विभागाला देण्यात आली असून त्यांनी प्राथमिक स्वरूपात या घटनेची दखल घेतली आहे. लवकरच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सांगोला येथे भेट देऊन स्थळ पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांतर्फे देखील उत्खननाच्या मागणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी सांगितले की, “सांगोला गावाच्या मध्यवर्ती भागात भुईकोट किल्ला होता. त्याची दुहेरी तटबंदी होती. सद्यस्थितीत दिसणारे अवशेष या तटबंदीचेच असावेत असे प्रथमदर्शनी दिसून येते. पुरातत्त्व विभागाने पाणी उपसून सखोल उत्खनन केल्यास हे अवशेष कोणत्या वास्तूचे आहेत ते स्पष्ट होईल.” सांगोला नगरपरिषदेच्या वतीने व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. दरम्यान खोदकामात अशा प्रकारे प्राचीन बांधकाम सापडल्याने स्थानिक प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घेतली आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.

पालिकेची पाहणी, अहवाल वरिष्ठाकडे पाठवला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24