पिंपरी बुद्रुक ते कृष्णापुर शिवरस्ता झाला खुला: उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी, रस्त्याच्या दुतर्फा केली जाणार वृक्षलागवड – Hingoli News



कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक ते कृष्णापुर शिवरस्ता रस्ता मागील पन्नास वर्षापासून अतिक्रमित झाला होता. त्यानंतर आता महसूल प्रशासनाने शेतकरी व गावकऱ्यांशी संवाद साधून बुधवारी ता. 6 शिवरस्त्याची माेजणी करून रस्ता खुला केला. यामुळे गावकरी व शेतकऱ्य

.

कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर ते पिंपरी बुद्रूक हा सुमारे 1 किलो मिटर अंतराचा शिवरस्ता मागील पंन्नास वर्षापासून अतिक्रमीत झाला होता. रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून् त्यावर जमीन कसण्यास सुरवात केली होती. त्यामुळे शेतकरी व गावकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सदर शिवरस्ता खुला करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या.

सध्या महसूल विभागाच्या वतीने कळमनुरी तालुक्यात महसूल सप्ताह साजरा केला जात आहे या सप्ताहामध्ये उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जिवक कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमातून हा शिवरस्ता खुला करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम, भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी एस. एस. ढोले यांच्यासह स्थानिक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर शेतकरी प्रकाश उपरे, प्रभाकर जाधव, अन्नपूर्णा उपरे, संजय जाधव, दीपक जाधव, मारुती जाधव, विलास जाधव, बंडू उपरे, गोरख उपरे, पंडित जाधव, नथुराम जाधव, प्रभाकर जाधव, दत्ता जाधव, यांच्या सह शेतकऱ्यांशी संवाद साधला. सदर रस्ता शिवरस्ता असून त्यावर अतिक्रमण करता येत नसल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर या रस्त्याची 33 फुटाची मोजणी करून रस्ता जेसीबीने खोदकाम करून खुला करण्यात आला. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. मागील 50 वर्षापासून अतिक्रमण झालेल्या या शिवरस्त्याने मोकळा श्‍वास घेतला असून यामुळे शेतकरी व गावकऱ्यांची सोय झाली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदार शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यातून जास्तीत जास्त वृक्षलागवड होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24