अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आनंद काळे यांचे संचालकत्व रद्द करण्याची मागणी करणारे प्रकरण विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या न्यायालयात सुरू आहे. हरिभाऊ मोहोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखल केलेल्या या प्रकरणाची सुनावणी बुधवार, ६ ऑगस
.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ क (अ) नुसार हे प्रकरण चालविले जात आहे. हरिभाऊ मोहोड यांच्यासह बारा संचालकांचा आरोप आहे की आनंद काळे बँकेच्या हिताविरुद्ध काम करतात. याच मुद्द्यावर काळे यांच्याविरुद्ध विभागीय सहनिबंधक यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सहकार विभागाने काळे यांना नोटीस बजावून आपले संचालकत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. पहिली सुनावणी २९ जुलै रोजी ठरली होती. परंतु काळे यांनी वेळ वाढवून मागितल्याने न्यायालयाने एक आठवड्याचा अवधी वाढवून दिला.
याआधी १४ जुलैपर्यंत स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. परंतु काळे यांनी नोटीसच मिळाली नाही असा युक्तिवाद करत त्या अवधीत स्पष्टीकरण सादर केले नाही. त्यामुळे हा खटला लांबला आहे.
हरिभाऊ मोहोड यांच्यासह जिल्हा बँकेच्या बारा संचालकांनी २१ एप्रिल २०२५ रोजी काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद आहे की काळे पदावर आरूढ झाल्यापासून बँकेच्या हिताविरूद्ध मनमर्जीने काम करत आहेत. नियमाशी तडजोड करून ते अपहार करत असल्याचेही या तक्रारीत नमूद आहे.
कलम ७८ अ नुसार त्यांनी केलेल्या खर्चाचा बोध होत नसल्याने त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी आहे. न्यायालयात दाखल केलेल्या एका प्रकरणी नेमण्यात आलेल्या वकिलाची फी बँकेच्या खात्यातून नियमबाह्य देण्यात आली, असा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
विभागीय सहनिबंधक यांनी आनंद काळे यांना संचालक पदावरुन निष्कासीत का करू नये अशी नोटीस बजावली आहे. १३ ऑगस्टच्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.