हेमंत चापुडे (प्रतिनिधी) पुणे : साप असं नुसतं नाव जरी काढलं तरी भल्याभल्यांची भीतीनं गाळण उडते आणि त्याला कारणही तसंच आहे. कारण दरवर्षी जगात 50 लाखांहून अधिक नागरिकांना सर्पदंश होतो. आणि धक्कादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्पदंशाचं प्रमाण सर्वाधिक आहे.
गेल्या काही वर्षात सर्पदंशाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालीये.. त्यामुळे जगासह भारताची चिंता वाढलीये. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 50 लाखांहून अधिक नागरिकांना सर्पदंश होतो. मात्र ही आकडेवारी केवळ 10 टक्केच आहे. सर्पदंश झालेल्या लोकांची अनेकदा नोंदच होत नाहीये.. त्यामुळे ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता आहे. भारतातील वातावरण हे सापांच्या वास्तव्यासाठी पोषक आहे. त्यामुळे भारतात सापांची संख्या सर्वाधिक आहे.
भारतात 270 प्रकारच्या सापांच्या प्रजाती आढळतात यातील 62 प्रजाती या निमविषारी म्हणजे कमी विषारी आहेत. तर 4 प्रजाती या अत्यंत विषारी म्हणून ओळखल्या जातात. ज्यात प्रामुख्याने नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे यांचा आणि त्यांच्या उपप्रजातींचा समावेश होतो. या विषाची सापांच्या प्राजातींना बिग फोर्स म्हणूनही ओळखलं जातं. या सापांच्या विषांचे गुणधर्म वेगळे आहेत. यातील नाग आणि मण्यार यांचं विष थेट मज्जा संस्थेवर परिणाम करतं तर घोणस आणि फुरसे यांचं विष रक्ताभिसरणावर आघात करतं.
सापाला शेतक-यांचा मित्र म्हटलं जातं. कारण शेतीचं उपद्रव करणा-या उंदीर आणि घुशींचा बंदोबस्त सापांमुळे होतो. मात्र सध्या सर्पदंशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यात ग्रामीण भागासोबत शहरी भागांचाही समावेश होतोय याला कारणही तसंच आहे. GFX IN गेल्या काही वर्षात बागायती क्षेत्र वाढलं आहे. शेतात सापांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सापांची संख्याही वाढली आहे. गाव तसंच शहरी भागालत मोठ्या प्रमाणात उत्खनन वाढलं आहे. त्यामुळे साप निवारा आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्तमध्ये शिरु लागलेत. बदलत्या हवामानामुळेही सापांचा मानवी वस्तीत शिरकाव वाढला आहे.
सर्पदंश झाल्यावर रुग्णाला तातडीनं उपचार मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी प्रतीसर्पविष हा एकमात्र उपाय आहे. मात्र ब-याचदा ग्रामीण भागात वेळेवर उपचार मिळत नाही. तर काही ग्रामस्थ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रुग्णांना दवाखान्यात नेतच नाहीत. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालीये. भारतात सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत. साप चावल्यानंतर कोणते प्रथमोपचार करायचे याबद्दल अनेकांना माहिती नसते. तसंच ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये प्रतिसर्पविषाचं प्रमाणही पुरेसं नसतं. त्यामुळे उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे दिसला साप की मार अशी भावना सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालीये.
निसर्गाच्या जीवसाखळीत साप हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. निसर्गाचं संतूलन राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मानवा सोबतच पृथ्वीवर त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. अशात सर्पदंशामुळे होणारे वाढते मृत्यू रोखण्यासाठी सापांपद्दल जनजागृती प्रभावी उपाय ठरू शकतो.