मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील रमी खेळतानाचा व्हिडीओ आणि अमरावती शहरात वाढलेले खून, चोऱ्या व गुंडगिरीचे प्रकार या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने आज, बुधवारी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांना साकडे घातले. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठ
.
दरम्यान आयुक्तांना भेटण्यापूर्वी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘मंत्रीच खेळतात रमी, तेथे कायदा-सुव्यवस्थेची काय हमी ?’ अशा प्रश्नरुपी घोषणा देत या आंदोलनाकडे इतरांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या निरीक्षणानुसार गेल्या महिन्याभरात शहरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एमडी ड्रग्ज, गांजा व चायना चाकू यांची विक्री शहरात राजरोसपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे अवैध जुगार अड्ड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकंदरीत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांनी शहरात आपले हातपाय सगळीकडे पसरले आहेत. याचा शहराच्या सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत आहे.
शहरातील अनेक बार वा पबमध्ये मध्यरात्री उशीरापर्यंत पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. शहरात काही ठिकाणी अल्पवयीन मुलांना सर्रास दारू विकली जात आहे. यावर तत्काळ प्रभावी उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे असल्याचे पोलिस आयुक्त यांना सांगण्यात आले. अमरावती हे शहर क्राईम कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याची भावना एका आमदारांनी विधान भवनात बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे एकंदरीत शहरातील शांतता, सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची सार्वत्रिक भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिस प्रशासनाचे अस्तित्व कुठेही दिसत नसल्याची भावनासुद्धा नागरिकांमध्ये आहे, हेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जवंजाळ, वैभव देशमुख, सागर कलाने, अनिकेत ढेंगळे, आशिष यादव, संकेत साहू, मोहीत भेंडे, धनंजय बोबडे, कौस्तुभ देशमुख, संकेत भेंडे, शुभम बांबल, कृणाल गावंडे, पियुष अभ्यंकर, चैतन्य गायकवाड, श्रेयस धर्माळे, वेदांत केने, अमेय देशमुख, आकाश गेडाम, कुणाल जोध आदी उपस्थित होते.