Jain Dharma : भारतात विविध जाती धर्माचे धर्माचे लोक राहतात. भारतात हिंदू मुस्लिम धर्माची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तर, या धर्मांसह ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन या सह विविध धर्माचे लोक फार कमी आहे. यापैकी सार्वात कमी लोकसंख्या ही जैन धर्माची आहे. जैन धर्माची लोकसंख्या कमी असली तरी हा समाज सर्वात श्रीमंत आहे. महाराष्ट्राच काय संपूर्ण भारतात हिंदू मुस्लिम नाही तर जैन धर्माचे लोक सर्वात श्रीमंत आहेत. यांच्यात कुणीच गरीब नाही. जाणून घेऊया श्रीमंतीचे रहस्य काय आहे.
जैन धर्माचे लोक सर्वांपासून अलिप्त असतात. मात्र, जैन धर्माचे लोक त्यांच्या श्रीमंतीमुळे नेहमीच र्चेतत असतात. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर नजर टाकली असता जैन धर्माचे लोक किती श्रीमंत आहेत याचा अंदाज येतो. भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी अनेक उद्योजक हे जैन धर्मीय आहेत. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती दोघेही जैन धर्माचे आहेत. भारतातील सर्वात छोटी कम्युनिटी अर्थात लहान समुदाय असलेल्या जैन धर्मींयांकडे एवढे पैसा कुठून येतो? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र, जैन धर्माच्या लोकांच्या वागण्यात आणि त्याच्या रोजच्या जीवन शैलीतच त्यांच्या गर्भ श्रीमंतीचे रहस्य दडलेले आहे.
भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.
भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.
गोल्ड इंडस्ट्री, डायमंड इंडस्ट्री, शेअर मार्केट, कमॉडिटी इंडस्ट्री, एयरलाइन इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, रीयल इस्टेट सेक्टर अशा अनेक क्षेत्रात जैन समाजाची लॉबी पाहायला मिळते. या समाजाचे लोक नोकरी न करता पारंपारिक व्यवसाय पुढे नेतात. व्यवसायाच्या बाबतीतलं नियोजन ते खूप लहान वयातच शिकतात. यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. प्रगती झाल्यावर हाती पैसासुद्धा लवकर येतो. जैन धर्माचे लोक कोणतेही व्यसन करत नाहीत. चैनीच्या गोष्टी, पार्टी, मौज मजा यावर जैन धर्मीचे लोक पैसा खर्च करत नाही. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते. आपल्याकडचा पैसा ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवतात. यामुळे जैन धर्मीय विविध व्यवसायाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडत राहतात.
जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही, तर नाव कमवून, धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने श्रीमंत असतात. जैन धर्माचे लोक फक्त स्वत:च्या प्रगतीवर फोकस करत नाहीत. जैन धर्मातील लोक त्यांच्या समाज बांधवांना देखील व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात. यामुळेच जैन धर्मात कुणाही गरीब नाही.
FAQ
1. जैन धर्माची भारतातील लोकसंख्या किती आहे?
भारतात जैन धर्मीय लोकांची लोकसंख्या फक्त 0.3 टक्के आहे, जी देशातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या समुदायांपैकी एक आहे.
2. जैन धर्मीय लोक इतके श्रीमंत का मानले जातात?
जैन धर्मीय लोक त्यांच्या व्यवसायातील नियोजन, आर्थिक शिस्त, आणि बचतीच्या सवयींमुळे श्रीमंत मानले जातात. ते पारंपारिक व्यवसाय पुढे नेतात आणि पैशाची विविध क्षेत्रात गुंतवणूक करतात, ज्यामुळे त्यांची संपत्ती वाढते.
3 जैन धर्मीयांचे इन्कम टॅक्समधील योगदान किती आहे?
भारताच्या एकूण इन्कम टॅक्स आकडेवारीत सुमारे 24 टक्के कर जैन धर्मीय लोक भरतात, जे त्यांच्या आर्थिक सामर्थ्याचे द्योतक आहे.
4. जैन धर्मीय समाजात गरीब का नाहीत?
जैन धर्मीय आपल्या समाज बांधवांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात. ते केवळ स्वतःच्या प्रगतीवरच नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे त्यांच्या समाजात गरीबी नाही.
5. जैन धर्मीयांच्या श्रीमंतीचे रहस्य काय आहे?
जैन धर्मीयांच्या श्रीमंतीचे रहस्य त्यांच्या जीवनशैलीत आहे. ते व्यसनांपासून दूर राहतात, चैनीवर खर्च टाळतात, पैशाची बचत करतात आणि विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतात. तसेच, ते समाजातील इतरांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देतात.