Pune Nagpur Vande Bharat Express: महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस पुणे-नागपूर-पुणे अशी धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. येत्या महिनाभरात ही रेल्वे गाडी सुरू होण्याची शक्यता असून मध्य रेल्वेकडून सध्या तसे नियोजन सुरू आहे.
सध्या पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर आणि हुबळी या तीन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. तर आता आणखी एका वंदे भारत एक्स्प्रेसची भर पडली आहे. पुणे-नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातून अनेक जण विदर्भात प्रवास करतात. अकोला, अमरावती, नागपूर या परिसरातून अनेक जण पुण्यात येतात. ही गाडी सुरू झाल्यानंतर या नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. नागरिकांचा प्रवास सुमारे दोन तासांना कमी होणार आहे.
पुणे ते नागपूर हे अंतर सुमारे 900 किमीचे असून नऊ ते साडे नऊ तासांत पार करता येणार आहे. सध्या पुणे-नागपूर मार्गावर हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वात जलद रेल्वे सेवा आहे. पुणे ते नागपूर हे अंतर पार करण्यासाठी दुरांतोला 12 तास 55 मिनिटे वेळ लागलो. मात्र वंदे भारतमुळे तीन तासांचा वेळ वाचणार आहे.
किती स्थानकांवर थांबणार?
पुण्यावरुन ही गाडी निघाल्यानंतर दौंड, अहिल्यानगर कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, अजनी या ठिकाणी थांबणार आहे.
कसे असेल वेळापत्रक?
पुण्याहून सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी वंदे भारत सुटेल, अजनीला संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल, अजनीहून 9 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि पुण्याला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.
दरम्यान, पुणे-नागपूर हे अंतर तब्बल 900 किमीचे आहे. हा प्रवास जास्त असल्याने वंदे भारत स्लीपर कोचची मागणी होत आहे. एवढे अंतर बसून प्रवास करणे त्रासदायक होऊ शकते. त्यामुळं स्लीपर कोचची मागणी करण्यात येत आहे.
1) पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरू होणार आहे?
ही वंदे भारत एक्स्प्रेस येत्या महिनाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेकडून सध्या याबाबत नियोजन सुरू आहे.
2) पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक काय आहे?
पुणे ते अजनी (नागपूर): सकाळी 6:20 वाजता सुटेल आणि संध्याकाळी 6:20 वाजता अजनीला पोहोचेल.
अजनी ते पुणे: संध्याकाळी 9:20 वाजता सुटेल आणि रात्री 9:30 वाजता पुण्याला पोहोचेल.
3) या गाडीमुळे प्रवाशांना काय फायदा होईल?
प्रवासाचा वेळ 2-3 तासांनी कमी होईल.
पुणे आणि विदर्भ (अकोला, अमरावती, नागपूर) यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.
सध्याच्या गाड्यांमधील गर्दी आणि तिकीट उपलब्धतेच्या समस्येवर उपाय मिळेल.
आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल.