मतदान शाळेत नको भाजपच्या कार्यालयात घ्या: बच्चू कडू यांचा EC ला टोला; VVPAT न वापरण्याच्या निर्णयावर उपस्थित केला सवाल – Mumbai News



आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर न करण्याच्या मुद्यावरून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी यांनी निवडणूक आयोगावर तिखट हल्ला चढवाल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होत नसेल तर मतदान

.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी राज्यात डिसेंबर – जानेवारी महिन्यात टप्प्याटप्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यांच्या या निर्णयावर आता विरोधी पक्ष सडकून टीका करत आहेत. माजी आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणी आयोगाच्या निर्णयावर हल्ला चढवला. तसेच या प्रकरणी आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले.

भाजप कार्यालयात ठपके मारा

आता निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार नाही. त्यामुळे निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयात ठपके मारा. कारण, 2-3 देश सोडले तर ईव्हीएम मशीन कुठेच वापरली जात नाही. त्यामुळे मतदान हे शाळेत न ठेवता भाजपच्या कार्यालयात ठेवण्याची मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठवणार आहे, असे बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी पण राज ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या मुद्यावर भेट घेतल्याचेही स्पष्ट केले. राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती. त्यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हाच आमचा हेतू आहे.

मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहावे

सध्या शेतकरी अडचणीत आहे. पण सरकार त्याची टिंगल करत आहे. दुष्काळ पडला की कर्जमाफी मागतात असे मुख्यमंत्री म्हणतात. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, हे शेतकऱ्यांचे दुःख दुष्काळाहून मोठे असते. त्यामुळे मी राज ठाकरे यांना आमच्या भागात येऊन शेतकऱ्यांना संबोधित करण्याची विनंती केली. मुंबईनेही आंदोलन सुरू असताना एक-दोन तास शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे. हा विषय कोणत्याही जातीधर्माचा किंवा पक्षाचा नाही. आमचा अजेंडा निवडणुकीचा नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे.

आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. शेतकऱ्यांचा विषय जनतेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 9 तारखेला रक्षाबंधन आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वेदनांची राखी बांधणार आहोत, असे कडू म्हणाले.

राज ठाकरेंचा कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांच्या पदयात्रेसह चक्काजाम आंदोलनात सहभागी झालो होतो. त्यांची भावना शेतकऱ्यांसाठी आहे. त्यात काहीही चुकीचे नाही. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी व दिव्यांगांसाठी ते मोठे काम करतात. तिथे राज ठाकरे यांची एक सभा व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्याला साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद रहावी यावर मनसे सकारात्मक आहे, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24